snehal mandhare, satara, Shiv Chhatrapati Award : saam tv
Sports

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर; साता-याच्या स्नेहल मांढरेचा गाैरव

Archer Snehal Mandhare : स्नेहल मांढरे हिच्या यशामुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

Siddharth Latkar

Shiv Chhatrapati Award News : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्या साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे (Snehal Mandhare) हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या स्नेहलला सन 2019-20 या कालावधीतील पुरस्कार आज (शनिवार) जाहीर झाला आहे. (Maharashtra News)

राज्यातील क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गाैरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येताे. राज्य शासनाने आज (शनिवार) सन 2019-20 आणि सन 2020-21 तसेच 2021-22 या तीन वर्षाचे पुरस्कारर्थींचे (Shiv Chhatrapati Award Declared Today) नावे जाहीर केली आहेत.

यामध्ये साता-याच्या आर्चरी (archery) खेळातील स्नेहल मांढरे हिचा समावेश आहे. स्नेहलने वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने आर्चरी खेळातील एकेक यश पादाक्रांत केले. आचारपणामुळे ती काही काळ खेळापासून दूरावली गेली हाेती. परंतु तिने जिद्दीने आजारावर मात करीत खेळातील नैपुण्य सिद्ध केले.

स्नेहल मांढरेने विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंडच्या वरिष्ठ संघासाठी कामगिरी बजावली आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने तिच्या यशाचे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT