सचिन जाधव-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने मानाची गदा पटकावली. मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये झालेल्या सामन्यात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
सेमीफायनलमध्ये झालेल्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे दोन्ही खेळाडू आमनेसामने होते. या सामन्यात पंचांनी चुकीचा निर्णय देण्यावरुन चांगलाच वाद रंगला.
पृथ्वीराज मोहोळने हा सामना जिंकून फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं. तर पराभूत झालेल्या शिवराज राक्षेने संतापात पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथ मारली. दरम्यान फायनलमध्येही महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले होते. आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
1) शिवराज राक्षे - पंचानी मी चित्रपट झालो असा निर्णय दिला त्याला मी चॅलेंज केले परंतु तो व्हिडिओ पाहीला गेला नाही .
उत्तर - जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमानूसार, मॅटवरील पंचानी कुस्तीचा निर्णय चितपट दिला असेल व त्यास साईड पंच व मॅट चेअरमन यांची मान्यता असेल तर अशा चितपट झालेल्या कुस्तीचे चॅलेंज स्विकारले जात नाही.
शिवराज राक्षे व त्याच्या कोचने चितपटाला चॅलेंज करुन ते अपिल ऑफ ज्युरीकडे निर्णय मागण्यासाठी आले त्यावेळी अपिल ऑफ ज्युरीने ३ पंचाना एकत्र बोलावून त्यांना त्यांचा निर्णय विचारला. तिन्ही पंचानी एकमताने कुस्ती चितपट झाली आहे असा निर्णय दिला त्यामुळे अपिल ऑफ ज्युरीने जागतिक नियमानुसार व्हिडिओ पाहण्यास नकार दिला आहे . याबाबत आपण जागतिक नियमाची खात्री करावी .
2) शिवराज राक्षेचे कोच - काका पवार यांच्या तालमीतील कुस्तीगीरांवर जाणून बुजून अन्याय केला जातो ..
उत्तर - काकासाहेब पवार यांच्या तालीमीतील अनेक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील १० ते १२ कुस्तीगीरांनी विविध वजनीगटात पदके मिळवली आहे. जाणून बुजून अन्याय करायचा असता तर तिथे सुध्दा त्यांच्यावर अन्याय झाला असता परंतू तसे झाले नाही .
3) शिवराज राक्षे - पंचावर कारवाई होणे आवश्यक आहे.
उत्तर - कोणाची पंचाच्या निर्णयाविरुध्द काही तक्रार असेल तर त्याबाबत लेखी तक्रार त्यांनी कुस्तीगीर संघाकडे करणे आवश्यक असून त्यांची लेखी तक्रार आल्यानंतर कुस्तीगीर संघ त्याबाबत शहानिशा करुन नक्कीच कुस्तीगीरांना न्याय देईल.
4) पत्रकार - शिवराज व महेंद्र विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल का नाही केला ?
उत्तर - शिवराज नुकताच नोकरीस लागलेला आहे व महेंद्र सुध्दा नोकरीस लागणार आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्यांना नोकरीवर केसचा निकाल लागेपर्यंत घेतले जाणार नाही व त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते हा विचार करुन संबधित पंचानी गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतला
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे मत - पंचाचा निर्णय चुक की बरोबर यापेक्षा प्रत्येक खेळाडूने पंचाना मारण्यास सुरुवात केल्यावर स्पर्धेसाठी पंच आणायचे कूठून ? हा प्रश्न संघटनेपुढे निर्माण होईल त्यामुळे संघटनेच्या रजिस्टर पंचाना संरक्षण देणे हे संघटनेचे प्रथम कर्तव्य आहे . पंच काही देव नाही ती सुध्दा माणसेच आहेत परंतु त्यांच्याकडून जर चुक झाली असेल व त्याबाबत कोणाची तक्रार आली असेल तर नक्कीच त्या तक्रारीची दखल घेऊन पंचावर कारवाई करण्याची जबाबदारी संघटनेची असेल . असे स्पष्टीकरण संघटनेकडून देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.