M. S. Dhoni
M. S. Dhoni Saam Digital
क्रीडा | T20 WC

M. S. Dhoni : MS धोनीसंदर्भात मोठी बातमी! IPL मधील निवृत्तीवरून CSK चे मालक काशी विश्वनाथन यांचं मोठं वक्तव्य

Sandeep Gawade

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2024 मधून बाहेर पडताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार का हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांना पडला होता. धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही? हाच प्रश्न चेन्नई सुपर किंग्जचे मालक कासी विश्वनाथन यांनाही विचारण्यात आला असून त्यांनी त्यांचं उत्तरही दिलं आहे. धोनी पुढील हंगामात खेळू शकतो, असे संकेत काशी विश्वनाथनने दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर कासी विश्वनाथन म्हणाला, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की धोनी त्याचे सर्व निर्णय स्वत: घेतो आणि योग्य वेळीच त्याची घोषणा करतो. तो ज्यावेळी निर्णय त्यानंतरच आम्हाला त्याचा निर्णय कळेल. पण मला आणि चाहत्यांना आशा आहे की धोनी पुढच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळेल.

धोनी दुखापतीसह संपूर्ण आयपीएल सीझन खेळला आहे आणि तो उपचारासाठी लंडनला जाऊ शकतो, असं वृत्त आहे. धोनी पुढील हंगामात खेळू शकेल की नाही हे उपचारानंतरच कळेल. धोनीकडे अजून बराच वेळ आहे. धोनीचा जिवलग मित्र सुरेश रैनानेही या धोनीने पुढच्या हंगामात खेळावं, असं म्हटलं आहे.

धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबाबत बोलायचं झालं तर त्याने या हंगामातही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. धोनीने या मोसमात 110 च्या सरासरीने 110 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 230 च्या आसपास होता. फिनिशरच्या भूमिकेत त्याने उत्कृष्ट भूमिका निभावली आहे. मात्र सध्या तो पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. याचं उत्तर मिळाल्यावर धोनीचा पुढचा निर्णय स्पष्ट होईल, असं काशी विश्वनाथन यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Exam Scam : नीट घोटाळ्याची कशी होती मोडस ऑपरेंडी? सावज कसं हेरायचे? इंटरेस्टिंग इनसाइड स्टोरी, VIDEO

Lok Sabha Speaker Election: कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान

OnePlus नंतर आता Redmiही आणणार 108MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या इतर फीचर्स

CBI Arrest Kejriwal: तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

IRCTC Nepal Package: पत्नी,गर्लफ्रेन्डसोबत क्वालिटी टाईम घालवायचय? मग नेपाळचं खास पॅकेज घ्या; ऑफर ऐकून तुम्हीही म्हणाल 'एक नंबर'

SCROLL FOR NEXT