LSG vs GT 2024: x IPL
Sports

LSG vs GT 2024: लखनऊमध्ये गुजरात टायटन्सची 'टाय टाय फिश'; यश ठाकूरसमोर गिलच्या सेनेने गुडघे टेकले

LSG vs GT 2024: केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने ३३ धावांनी सामना जिंकला. लखनऊ संघाचा हा तिसरा विजय ठरला. केएल राहुलच्या संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

Bharat Jadhav

Lucknow Super Giants vs Gujarat Titans :

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. लखनऊत झालेल्या सामन्यात यश ठाकूरच्या गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सच्या खेळांडूनी नांगी टाकली. लखनऊने दिलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना गिल सेना पूर्णपणे फेल ठरली. (Latest News)

केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने ३३ धावांनी सामना जिंकला. लखनऊ संघाचा हा तिसरा विजय ठरला. केएल राहुलच्या संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर लखनऊने पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि आता गुजरात टायटन्सचा पराभव केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माफक १६३ धावा करूनही गुजरातला आव्हान पार करता आल्या नाहीत. लखनऊच्या नवाबांनी हा सामना जिंकल्याने लखनऊचे चाहते खूश झालेत. दरम्यान लखनऊच्या संघाने माफक १६० धावांचं आव्हान देऊन हा विजय मिळवलाय. हा पराक्रम लखनऊच्या संघाने तब्बल १३ वेळा केलाय. त्याचबरोबर या संघाने गुजरातला पहिल्यांदा पराभूत करत नवा इतिहास घडवलाय.

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकात ५ विकेट गमावत १६३ धावा केल्या. गुजरातला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा संघ १८.५ षटकांत १३० धावांवर गारद झाला. लखनऊचा गोलंदाज यश ठाकूरने गुजरातच्या संघाला आपल्या समोर नांगी टाकण्यास भाग पाडलं. ठाकूरने या सामन्यात तब्बल ५ विकेट घेत लखनऊच्या संघाला यश मिळवून दिलं.

दरम्यान गुजरातकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने ३१ आणि राहुल तेवतियाने ३० धावा केल्या. शुभमन गिलने १९ विजय शंकरने १७ आणि दर्शन नळकांडेने १२ धावा केल्या. लखनऊच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. यात यश ठाकूरने सर्वाधिक ५ बळी घेतले. कृणाल पांड्याने तीन बळी घेतले. नवीन उल हक आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT