लखनऊ सुपर जायंट्स हा आयपीएल स्पर्धेतील नवखा संघ आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेतून पदार्पण करणाऱ्या या संघाने केएल राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुलला रिलीज केलं असल्याची चर्चा सुरु आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांच्यात बाचाबाची झाली होती. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यावेळीच असं म्हटलं जात होतं की, हे केएल राहुलचं शेवटचं हंगाम असणार आहे. आता स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, लखनऊने केएल राहुलला रिलीज करण्याचा प्लान केला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा संघ ३ खेळाडूंना रिटेन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मयांक यादव, रवी बिश्नोई आणि वेस्टइंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनचा समावेश आहे. मयांक यादवने गेल्या वर्षी आपल्या वेगवान गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. तर रवी बिश्नोईने देखील शानदार गोलंदाजी केली होती. तर केएल राहुलच्या अनुपस्थितीत पूरनने नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती.
मयांक यादवला बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. त्यामुळे तो आता अन्कॅप्ड खेळाडू नसणार आहे. त्यामुळे लखनऊचा संघ त्याला १४ किंवा ११ कोटी रुपये देऊ शकतो. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी देण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.