Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants saam tv
Sports

IPL 2026: लखनौच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ; CSK तळाशी, मुंबई कितव्या स्थानावर?

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants: कोलकाता आणि लखनऊ यांच्यातील सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. मुकुल चौधरीच्या दमदार खेळीमुळे लखनऊने 3 विकेट्सनी विजय मिळवला. या निकालामुळे IPL पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर गुरुवारी रंगलेला सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार अुभवायला मिळाला. कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीत लखनऊने शेवटी 3 विकेट्सनी विजय खेचून घेतला. दरम्यान लखनऊच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल पाहायला मिळतायत.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकात्याने लखनऊसमोर 182 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र मिडल ऑर्डरमध्ये आयुष बडोनीने डाव सावरला. बडोनीने 34 चेंडूत 2 सिक्स आणि 7 चौकारांसह 54 रन्सची महत्त्वाची खेळी केली.

खरा हिरो ठरला मुकुल चौधरी

मात्र सामन्याचा खरा हिरो ठरला तो मुकुल चौधरी. त्याने अवघ्या 27 चेंडूत 7 सिक्स आणि 2 चौकारांच्या जोरावर नाबाद 54 रन्स करत सामना लखनऊच्या बाजूने फिरवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात त्याच्या दमदार खेळीमुळेच लखनऊने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या या कामगिरीसाठी मुकुल चौधरीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला.

पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल

या विजयामुळे लखनऊच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेत पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. कोलकात्याची अवस्था आणखी बिकट झाली असून टीम नवव्या स्थानावर घसरलीये.

पॉइंट्स टेबलवर नजर टाकल्यास राजस्थान रॉयल्स 3 सामन्यांत 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. पंजाब किंग्स 5 पॉईंट्समुळे दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 4 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात ४ पॉईंट्स असून ते चौथ्या स्थानी आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स 4 गुणांसह पाचव्या स्थानावर असून सनरायझर्स हैदराबाद सहाव्या, गुजरात टायटन्स सातव्या आणि मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता 4 सामन्यांत केवळ 1 गुणांसह नवव्या स्थानावर असून चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात एकही पॉईंट्स नसल्याने ते तळाशी आहेत.

पॉईंट्स समान असलेल्या काही टीममध्ये स्थानातील फरक हा नेट रन रेटमुळे आहे. त्यामुळे आता येत्या काळात नेट रनरेटमुळे ही स्पर्धा अजूनच चुरशीची होणार आहे. आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्या सामना रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT