LSG vs KKR Match News: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स दरम्यान शनिवारी आयपीएलचा यंदाच्या हंगामाचा ६८ वा सामना झाला. कोलकाताचा कर्णधार नीतीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनौने २० षटकात कोलकाताला १७७ धावांचे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनौची सुरुवात खराब झाली. लखनौला तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. सलामीवर ५ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रेरक २० चेंडूत २६ धावा करत तंबूत परतला. प्रेरकनंतर मार्कस शून्यावर बाद झाला. लखनौचा कर्णधार क्रुणाल पांड्यादेखील ८ चेंडूत ९ धावा करून माघारी परतला.
क्रुणाल पांड्यानंतरही फलंदाजांची पडझड चालूच राहिली. डिकॉक २७ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. डिकॉकनंतर बदोनी आणि पूरनने संघाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पूरन आणि बदोनीने अर्धशतकी भागिदारी रचली. शार्दुलच्या गोलंदाजीवर पूरनने लागोपाठ दोन षटकार लगावले.
तिसऱ्या चेंडूत षटकार लगावताना पूरन बाद झाला. पूरनच्या अर्धशतकी खेळीने संघाला तारले. लखनौने कोलकाताला जिंकण्यासाठी २० षटकात १७७ धावांचे आव्हान दिले आहे.
यंदाचा आयपीएल हंगाम केकेआरसाठी फार काही खास ठरला नाही. केकेआरची टीम योग्य नियोजन करण्यात अपयश आलं. कोलकाता आतापर्यंत १३ सामन्यांपैकी ७ सामने पराभूत झाले आहेत. यापैकी कोलकाताने ४ सामने घरच्या मैदानावर हरले आहेत. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ क्लालिफाय झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.