LSG vs GT Rishabh pant and Shubman gill : गुजरात की लखनऊ? कुणाचं पारडं जड? वाचा पिच रिपोर्ट... saam tv
Sports

LSG vs GT Pitch Report : दोन तगडे संघ, दोन्ही युवा कर्णधार, लखनऊ-गुजरात भिडणार; खेळपट्टी कुणाला साथ देणार?

lucknow vs gujarat today match preview : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज, शनिवारी १२ एप्रिलला लखनऊच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये लढत होणार आहे. खेळपट्टी आज कुणाला साथ देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वाचा पिच रिपोर्ट...

Nandkumar Joshi

दोन्ही तगडे संघ, दिग्गज खेळाडू आणि रिषभ पंत आणि शुभमन गिल हे दोन्ही युवा कर्णधार... लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज, शनिवारी आमनेसामने येणार आहेत. गिलच्या नेतृत्वात शुभमन गिलचा गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्यासाठी झुंजणार आहे. तर रिषभ पंतचा लखनऊ संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी भिडणार आहे. लखनऊनच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. इथली खेळपट्टी कुणाला साथ देणार, कुणाचं पारडं जड असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लखनऊ विरुद्ध गुजरात यांच्यात आयपीएल २०२५ मधील २६ वा सामना आज, लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी मैदानात होत आहे. दुपारीच कडाक्याच्या उन्हात हा सामना होणार आहे. नाणेफेकीसाठी कर्णधार रिषभ पंत आणि शुभमन गिल हे मैदानात सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी येतील. लखनऊचा संघ विजयाची हॅट्ट्र्रिक साधणार का, हे पाहावं लागेल. गुजरात संघाचे अव्वल स्थान पटकावण्याचे मनसुबे असतील.तत्पूर्वी लखनऊची खेळपट्टी कुणाला साथ देणार हे पाहूयात.

लखनऊची खेळपट्टी खूपच बदलली आहे. त्यामुळे सध्या तरी ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असणार आहे. यापूर्वी ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल होती. पण गेल्या काही दिवसांत खेळपट्टी फलंदाजांना मदतगार ठरत आहे. हा सामना दिवसा होणार आहे. त्यामुळे पहिल्या डावात चेंडूचा वेग कमी असणार आहे. मात्र, फलंदाजांना धावा खोऱ्यानं ओढता येणार आहेत. दिवसा सामना होणार असल्यानं नाणेफेक जिंकणारा संघ पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण संध्याकाळी फलंदाजी करणं थोडं सोपं होणार आहे. त्यामुळे या मैदानात २०० हून अधिक धावा होण्याचा अंदाज आहे.

आयपीएलमध्ये या मैदानातील रेकॉर्ड

लखनऊच्या या मैदानात आयपीएलचे एकूण १६ सामने खेळवण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं या ठिकाणी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर आव्हानाचा पाठलाग करताना या मैदानात सात सामन्यांत विजय मिळाला आहे.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी अधिक वेळा जिंकला आहे. तर नाणेफेक गमावणारा संघ या मैदानावर सहा वेळा जिंकला आहे. या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या २३५ आहे. तर १०८ ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघानं १७७ धावा करून विजय साकार केलेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं या मैदानात सरासरी १६८ धावा केल्या आहेत.

लखनऊ-गुजरात हेड टू हेड

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये पाच वेळा समोरासमोर उभे ठाकले होते. त्यातील चार सामने जिंकून गुजरातनं आपला दबदबा राखला आहे. तर लखनऊने फक्त एकदा विजय मिळवला आहे. २०२४ मध्ये हा विजय मिळाला होता. आपल्या घरच्या मैदानावर सामना जिंकून लखनऊ संघ कमबॅक करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT