ayush badoni twitter
Sports

Ayush Badoni: 27 चेंडूत 146 धावा; लखनऊच्या खेळाडूचं दिल्लीत वादळ, गेलचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला- VIDEO

Ayush Badoni, Delhi Premier League: लखनऊ सुपर जायंट्स संघाचा युवा फलंदाज आयुष बदोनीने दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पाडला आहे.

Ankush Dhavre

Ayush Badoni News In Marathi: टी -२० क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाज म्हटलं तर, वेस्टइंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेलची आठवण येते. गोलंदाज जितक्या वेगाने चेंडू टाकायचा, गेल त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू मैदानाबाहेर पाठवायचा.

स्टेडियमची बाऊंड्री कितीही मोठी असूद्या, गेल पुढं ती छोटीच पडायची. चौकार, षटकार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन. अशीच काहीशी झलक भारताचा युवा स्टार फलंदाज आयुष बदोनीच्या फलंदाजीत पाहायला मिळाली आहे.

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत आयुष बदोनीने (Ayush Badoni) धावांचा पाऊस पाडला आहे. तो जवळपास ख्रिस गेलचा टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडणारच होता. मात्र हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. ख्रिस गेलच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये १७५ धावांची खेळी करण्याची नोंद आहे. तर आयुष बदोनीने १६५ धावांची खेळी केली.

आयुष बदोनीची विस्फोटक खेळी

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतील सामन्यात आयुष बदोनीने ५५ चेंडूंचा सामना करत १६५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १९ षटकार आणि ८ चौकार खेचले. त्याच्या या विस्फोटक खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान टी -२० क्रिकेटमध्ये कुठलाही युवा फलंदाज इतकी आक्रमक फलंदाजी कशी काय करू शकतो? यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात साऊथ दिल्ली सुपरस्टार्स आणि नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात आयुष बदोनीचं विस्फोटक रूप पाहायला मिळालं आहे.

आपल्या या खेळीदरम्यान त्याने ३९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढील १६ चेंडूत त्याने ६५ धावा कुटल्या. या तुफानी फटकेबाजीसह त्याने ५५ चेंडूत १६५ धावांची खेळी केली. या विस्फोटक खेळीनंतर त्याचा भाव चांगलाच वधारणार आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात त्याच्यावर रेक्रोड ब्रेक बोली लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT