ICC U19 Womens T20 World Cup Asia saam tv
Sports

Cricket Lowest Score: अरेरे! असं कोण खेळतं व्हय? संपूर्ण संघाचा अवघ्या 'सहा' धावात झाला करेक्ट कार्यक्रम

सध्या क्रिकेट विश्वात या या टीमच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची चर्चा रंगली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cricket News: क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानावर रोज वेगवेगळे विक्रम होत असतात. कोणी सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड करत तर कोणी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करतं. मात्र, सध्या चर्चा फक्त एका लाजिरवाण्या रेकॉर्डचीच होत आहे.

हा रेकॉर्ड म्हणजे संपूर्ण संघ अवघ्या सहा धावांमध्ये ऑलआऊट झाला आहे. या टीमच्या लाजिरवाण्या रेकॉर्डने क्रिकेटविश्वात चर्चा रंगली. कोणता होता हा संघ? कुठे झाला हा सामना, चला जाणून घेवू.

क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर कोणता खेळाडू कोणत्या विक्रमाला गवसणी घालेल याचा काही नेम नसतो. सध्या अशाच एका लाजिरवाण्या रेकॉर्डची सर्वत्र चर्चा आहे. अंडर १६ विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. ज्यामध्ये मध्यप्रदेश विरुद्ध सिक्कीममध्ये रंगलेल्या सामन्यात सिक्कीम संघाचा अवघ्या सहा धावात कार्यक्रमचं आटोपला.

या रेकॉर्डनंतर सिक्कीम संघाने २१२ वर्षापुर्वीचा विक्रमही मोडला. १२ जून १८१० मध्ये द बीस संघ इंग्लडविरुद्ध खेळताना सहा धावात सर्वबाद झाला होता. दरम्यान या दोन्ही संघातील सामना खोलवाडच्या जिमखाना ग्राउंड, सूरतमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मध्यप्रदेशने सिक्कीमचा पराभव केला.

या सामन्यात मध्यप्रदेशने (MP) टॉस जिंकून बँटिंगचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशने पहिला डाव 414 धावांवर घोषित केला. 414 धावांचा पाठलाग करायला आलेल्या सिक्कीमचा 43 धावांवर बाजार उठला. पहिल्या डावानंतर सिक्कीमचा पराभव दिसू लागला होता. मात्र सिक्कीम 6 धावांवरच सर्वबाद होईल याचा मात्र कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.

मध्यप्रदेशने हा सामना तब्बल डाव आणि तब्बल 365 धावांनी जिंकला. मध्यप्रदेशकडून गिरीराज शर्माने 1 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर आलिफ हसनने 5 ओव्हर्समध्ये 4 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT