WTC Final Scenario saam tv
Sports

WTC Final Scenario: सिरीजही हरली आणि WTC ची बादशाहतही गमावली; फायनल गाठण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागणार, पाहा समीकरण!

WTC Points Table: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २५ रन्सने पराभव केला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपुष्टात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २५ रन्सने पराभव केला. या पराभवासह न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये भारताला व्हाईट वॉश दिला. जिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपुष्टात आली आहे.

न्यूझीलंडने टीम इंडियाला भारतात टेस्ट सिरीजमध्ये 3-0 ने पराभूत करून इतिहास रचलाय. टीम इंडिया या सिरीजमध्ये एकही सामना जिंकू शकली नाही आणि न्यूझीलंड टीमने भारतात सलग तीन टेस्ट सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉइंट टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा नंबर वनचा मुकुटही हिसकावण्यात आलाय. इतकंच नाही तर टीम इंडियावर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.

पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचली टीम इंडिया

वानखेडेच्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. मात्र या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर घसरलीये. त्यामुळे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला .

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे आता ५८.३३ टक्के गुण आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाच्या पराभवाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला चांगलाच फायदा झालाय. ऑस्ट्रेलियाची टीम आता पहिल्या क्रमांकावर पोहोचलीये. तर न्यूझीलंडची टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

WTC फायनल गाठण्याची टीम इंडियाला अजूनही संधी

घरच्या मैदानावर इतक्या वाईट पद्धतीने पराभूत झाल्यानंतर आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याची संधी आहे का? न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होणार आहे.

या स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ५ टेस्ट सामने खेळवले जाणार आहेत. आता टीम इंडियाला जर स्वबळावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच पैकी चार टेस्ट सामने जिंकावे लागणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे दरवाजे टीम इंडियासाठी पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मात्र ही फायनल गाछणं इतकं सोपंही होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT