Kuldeep Yadav To Dismiss Alex Carey  saam tv
Sports

Video: कुलदीप यादवची जादूई फिरकी, नेमकं काय झालं ते बॅट्समनला कळलंच नाही; व्हिडिओ पाहाच

Kuldeep Yadav Magical ball : कुलदीपने एक जादूई चेंडू टाकून अॅलेक्स कॅरीला बाद केले. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Chandrakant Jagtap

Kuldeep Yadav To Dismiss Alex Carey : चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind Vs Aus 3RD ODI) हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण 50 षटके न खेळता 269 धावांवर बाद झाला.

पांड्या आणि कुलदीपने ३-३ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना २-२ विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने 47 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 33 आणि यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने 38 धावा केल्या.

या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवच्या फिरकीमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज गोंधळून गेले. कुलदीपने एक जादूई चेंडू टाकून अॅलेक्स कॅरीला बाद केले. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Sports News)

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात 3 बळी घेतले. परंतु अॅलेक्स कॅरीले त्याने जसे बाद केले ते अफलातून होते. कॅरीला त्याचा चेंडू समजलाच नाही आणि त्याने विकेट गमावली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. मात्र हार्दिक पांड्याने तीन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरबोर्डला विराम दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात आला. 6 विकेट पडल्या होत्या आणि अॅलेक्स कॅरीसमोर संघाचा डाव सांभाळण्याचे आव्हान होते.

कॅरी सावध खेळी खेळत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. पण कुलदीप यादवच्या फिरकीसमोर तो पूर्णपणे हतबल झाला. याच चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुलदीपच्या या जादुई चेंडूचे चाहते जोरदार कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT