Shikhar Dhawan Video: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असतानाच टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिखर धवन आहे. शिखर धवनने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे तो क्रिकेटमधून निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिके खेळत आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज होत आहे. या सामन्यात भारताने मजबूत सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास भारतीय गोलंदाजांनी लगाम घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर हा सामना आणि त्यासोबत ही मालिका देखील भारत जिंकू शकतो. या दरम्यानच शिखर धवनने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
शिखर धवनचे निवृत्तीचे संकेत!
भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमधून या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच शिखर धवनने आता क्रिकेट सोडून फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसतेय.
चित्रपटात दिसणार शिखर धवन?
शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आता त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवन पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. शिखर धवन फिल्म शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे या व्हिडिओत दिसते. त्याने या पोस्टद्वारे चाहत्यांना एक अपडेट देखील दिले आहे. 'आली रे आली! आता तुझी बारी आली! लवकरच नवीन काहीतरी घेऊन येत आहे' असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.
धवन याआधीही दिसलाय चित्रपटात
शिखर धवन याआधी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत 'डबल एक्सएल' चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. आता त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओतून असे संकेत मिळत आहेत की, तो क्रिकेट सोडून नव्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ पाहिल्यास तो लवकरच फिल्मी दुनियेत आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते. धवनच्या या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.