kraigg brathwaite saam tv
Sports

WI vs IND: कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज! धमकी देत म्हणाला...

Kraigg Brathwaite On Ind vs WI Series: या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने भारतीय संघाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

Ankush Dhavre

IND VS WI Test Series: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेला १२ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने भारतीय संघाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

ही मालिका सुरु होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट म्हणाला की, 'एक संघ, एक गोलंदाज आणि एक फलंदाज म्हणून काय करायचं हे आम्हाला माहित आहे. त्यासाठी आम्ही तयारी करतोय. आम्हाला भारतीय संघ आणि इथली परिस्थिती चांगलीच माहित आहे. त्यासाठी मानसिक तयारी करणं गरजेचं आहे. आम्हाला अचूक रणनीती बनवून ती अंमलात आणणं गरजेचं आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'डॉमिनिकाच्या मैदानावर पहिला कसोटी सामना रंगणार आहे. मला असं वाटतं की, चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्यने उपस्थित राहावं.' दुसरा कसोटी सामना २० जुलैपासुन त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २७ जुलैपासुन वनडे आणि ३ ऑगस्टपासुन ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय भारतीय संघ (Team India ODI Squad For West Indies Tour:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT