KKR vs PBKS IPL Match Result
KKR vs PBKS IPL Match Result Saam tv
क्रीडा | IPL

KKR vs PBKS IPL Match Result: रोमहर्षक सामन्यात कोलकाताची पंजाबवर मात; शेवटच्या षटकात सामना फिरला

Vishal Gangurde

Kolkata Knight Riders vs Punjab Kings IPL 2023 Match: आयपीएल २०२३ स्पर्धेचा ५३ वा सामना हा कोलकाता आणि पंजाबच्या संघामध्ये झाला. ईडन गार्डन स्टेडियमवर हा रोमहर्षक सामना झाला. पंजाबने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ पाच गडी राखून सामना जिंकला. (Latest Marathi News)

पंजाबने दिलेल्या धावसंख्येचा पाठलागाची सुरूवात जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरबाज याने केली. गुरबाजने १५ धावा कुटल्या. तर रॉयने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. कर्णधार नीतीश राणाने ३८ चेंडूत ५१ धावा कुटल्या.

राणाने डावात ६ चौकार आणि १ षटकार लगावला. राणा आणि व्यंकटेश अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी रचली.

राणा बाद झाल्यानंतर संघाची कमान रसेल आणि रिंकूने सांभाळली. तर पुढे रसेलने १९ व्या षटकात ३ षटकार लगावत, सामनाच फिरवला. रसेल शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद पंजाबकडून कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे आव्हानझाला. पुढे कोलकाताने पंजाबवर ५ गडी राखून विजय मिळवला.

पंजाबने कोलकाताला विजयासाठी दिले होते १८० धावांचे आव्हान

नीतीश राणाच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. प्रभसिमरनला सुरुवातीलाच तीन चौकार ठोकले. मात्र, दुसऱ्या षटकात प्रभसिमरनला बाद केले. प्रभसिमरनने अवघ्या १२ धावा केल्या. त्यानंतर भावुनका राजपक्षे ३ चेंडू खेळून बाद झाला.

पंजाबचे दोन गडी बाद झाल्यानंतर शिखर धवनने संघाची कमान सांभाळली. पुढे चक्रवर्तीने पंजाबचा चौथा गडी बाद केला. चक्रवर्तीने १३ व्या षटकात जितेश शर्माला बाद केले.

जितेश शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन माघारी परतला. शिखरने ४७ चेंडूत ५७ धावा कुटल्या. शिखरने डावात ९ चौकार आणि १ षटकार लगावला. ऋषि धवनला चक्रवर्तीने १७ व्या षटकात बाद केले. ऋषिने ११ चेंडूत १९ धावा कुटल्या. तर सॅम १८ व्या षटकात यष्टीरक्षकाला झेल देऊन बाद झाला. तर २० व्या षटकात केकआरच्या शाहरुखने दोन चौकार आणि १ षटकार लगावला. तर हरप्रितने १ षटकार लगावला. पंजाबच्या संघाने २० षटकात कोलकाताला १८० धावांचे आव्हान दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT