क्रीडा

KKR vs LSG : पुरनची आक्रमक फलंदाजी; लखनऊच्या संघाकडून केकेआरला १६२ धावांचे लक्ष्य

Bharat Jadhav

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants :

आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने केकेआसमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनऊकडून निकोलस पुरनने आक्रमक फलंदाजी केली. पुरनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. कर्णधार केएल राहुलने २७ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांशिवाय कोणत्याच खेळाडूला दमदार खेळी करता आली नाहीये. (Latest News)

मिचेल स्टार्कने कोलकात्यासाठी चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २८ धावा देत ३ बळी घेतले. स्टार्कशिवाय रसेल, चक्रवर्ती, नरेन आणि वैभव अरोरा यांना प्रत्येकी १ बळी मिळाला. आंद्रे रसेलने १ षटक टाकले. रसेलने १६ धावा देत १ बळी घेतला.

यंदाच्या हंगामात कोलकाता संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या संघाने चारपैकी तीन सामने जिंकलेत. पॉईट्स टेबलमध्ये केकेआर दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्ससुद्धा यात मागे नाही. या संघाने ५ पैकी ३ सामने जिंकले असून पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान आजच्या सामन्यात केकेआरने रिंकू सिंगच्या जागी हर्षित राणा आणलं आहे. तर लखनऊ सुपर जायंट्समध्ये देवदत्त पडिकल आणि नवीन उल हकच्या जागी दीपक हुडा आणि शामर जोसेफचा समावेश करण्यात आलाय.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:-

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, मोहसिन खान, शमर जोसेफ, रवी बिश्नोई, यश ठाकूर.

कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट, सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT