KKR vs DC IPL 2024  x twitter
Sports

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

KKR vs DC IPL 2024 : आयपीएलचा ४७ वा सामना कोलकता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर झाला असून हा सामना केकेआरने जिंकलाय.

Bharat Jadhav

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals : केकेआरने आपल्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट राखत पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाने २० षटकात ९विकेट गमावत १५३ धावा केल्या. कोलकताने १६.३ षटकात ३ विकेट गमावत १५७ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकताचा हा ६वा विजय आहे.

कोलकताकडून फलंदाजी करताना फिलिप सॉल्टने ३३ चेंडूत ६८ धावा केल्या.यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर २३ चेंडूत ३३ धावा केल्यानंतर नाबाद राहिला तर व्यंकटेश अय्यर २३ चेंडूत २६ धावा करत नाबाद राहिला. सुनील नारायणने १५ धावा करून तर रिंकू सिंग ११ धावा करून बाद झाला. तर दिल्लीकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेलला दोन विकेट मिळाल्या.

कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तम नेट रन रेटमुळे केकेआरकडे +०.९७६ पॉईंट्स आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे -०.४४२ पॉईंट्स आहेत. कोलकताने ८ सामन्यांत १० मिळवलेत. या ८ सामन्यात कोलकाताने ५ सामने जिंकलेत तर ३ सामने गमावलेत. दिल्लीने १० सामन्यांत ५ जिंकलेत आणि ५ सामन्यात पराभव झालाय. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. जर कोलकताने हा सामना जिंकला तर ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT