Kolkata Knight Riders vs Delhi Capitals :
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाला मोठी खेळी करू दिली नाही. कुलदीपच्या यादवशिवाय इतर कोणत्याही नामी फलंदाजांना त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येत २० धावा जोडता आल्या नाहीत. दिल्लीच्या संघाने कुलदीपने केलेल्या खेळीच्या जोरावार ९ विकेट गमावत २० षटकात १५३ धावा केल्या. केकेआरची फलंदाजी बघता हे आव्हान त्यांच्यासाठी माफक दिसत आहे.
दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने संघाला १५० धावांच्या पुढे नेले. कुलदीपने नाबाद राहत २६ चेंडूत ३५ धावा केल्या. यात ५ चौकार १ षटकाराचा समावेश आहे. कोलकताच्या गोलंदाजांचा सामना करताना दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकलेली दिसली. पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अभिषेक पोरेल, फ्रेझर मॅकगर्क या फलंदाजाला त्यांच्या धावसंख्याचा २० चा आकडा पार करता आला नाही.
ऋषभ पंतने २७ धावा केल्या. अभिषेक पोरेल १८ धावा, अक्षर पटेल १५, पृथ्वी शॉ १३ आणि फ्रेझर मॅकगर्क १२ धावा करून बाद झाला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेतले. वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी २ यश मिळाले. मिचेल स्टार्क आणि सुनील नारायणने १-१ विकेट घेतली.
कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तम नेट रन रेटमुळे केकेआरकडे +०.९७२ पॉईंट्स आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे -०.२७६ पॉईंट्स आहेत. कोलकताने ८ सामन्यांत १० मिळवलेत. या ८ सामन्यात कोलकाताने ५ सामने जिंकलेत तर ३ सामने गमावलेत. दिल्लीने १० सामन्यांत ५ जिंकलेत आणि ५ सामन्यात पराभव झालाय. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. जर कोलकताने हा सामना जिंकला तर ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स:
पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.