कबड्डीचा मोह कुणाला आवरतो का? आमदार ऋतुराज पाटील जेव्हा मैदानात उतरले तेव्हा काय झालं? (पहा व्हिडिओ)
कबड्डीचा मोह कुणाला आवरतो का? आमदार ऋतुराज पाटील जेव्हा मैदानात उतरले तेव्हा काय झालं? (पहा व्हिडिओ) Twitter/@ruturajdyp
क्रीडा | IPL

कबड्डीचा मोह कुणाला आवरतो का? आमदार ऋतुराज पाटील जेव्हा मैदानात उतरले तेव्हा काय झालं? (पहा व्हिडिओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापुर: कबड्डी हा अस्सल देशी खेळ खेळताना खेळाडूला जेवढा उत्साह असतो, तेवढाच उत्साह कबड्डी (Kabaddi) पाहणाऱ्यातही संचारत असतो. त्यामुळेच की काय दक्षिण कोल्हापुर (Kolhapur) मतदार संघाचे कॉंग्रेस आमदार ऋतुराज पाटील (MLA Ruturaj Patil) हे कबड्डी पाहता - पाहता थेट कबड्डीच्या मैदानाच उतरले आणि उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Does the lure of kabaddi cover anyone? What happened when MLA Rituraj Patil came on the field? Watch the video)

हे देखील पहा -

आमदार ऋतुराज पाटील यांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ इथे पहा:

त्याचं झालं असं की, दक्षिण कोल्हापुरच्या उचगावमध्ये खेळाडूंसाठी कबड्डी मॅटचे (Kabaddi Mat) उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कबड्डीचा सामनादेखील आयोजित करण्यात आला होता. सामना चांगलाच रंगला. कबड्डीचे दावपेच, रेड, डाय, प्रेक्षकांचा आणि खेळाडूंना उत्साह पाहुन आमदारांमधला खेळाडूही जागा झाला अन् आमदार पाटील उतरले ते थेट कबड्डीच्या मैदानातच... मग काय खेळाडूंसमोर आमदार उभे ठाकले, पण आमदार म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून. त्यांनी रेडही मारली आणि कबड्डी खेळण्याची आपली हौस पुर्ण करुन घेतली.

आमदारांच्या हा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होतोय. "खेळाडूंचा उत्साह पाहून मला सुद्धा कबड्डी खेळण्याचा मोह टाळता आला नाही आणि मग मी सुद्धा कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दक्षिण मतदारसंघातील उचगाव (Uchgaon, Kolhapur) येथे 'कबड्डी मॅट' उपलब्ध करून देण्यात आला आहे." तसेच आज कबड्डी खेळल्यामुळे लहानपणींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला, असंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाईक कुटुंब नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी ठाण्यात पोहोचले

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT