KL Rahul rejects interaction with Sanjiv Goenka saam tv
Sports

KL Rahul: केएल राहुलने घेतला अपमानाचा बदला? हात मिळवताना संजीव गोएंकांसोबत केलं असं की...! Video होतोय व्हायरल

KL Rahul rejects interaction with Sanjiv Goenka: दिल्ली विरूद्ध लखनऊ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये केएल राहुल आणि संजीव गोएंका यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने २२ एप्रिल रोजी पुन्हा एकदा त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा सादर केला. मंगळवारी एकाना स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनऊचा धुव्वा उडवत दिल्लीने ८ विकेट्सने सामना जिंकला.

या सामन्यात दिल्लीचा फलंदाज केएल राहुलने मॅच विनिंग अर्धशतक झळकालं. राहुलने ५७ रन्सची खेळी करत पुन्हा एकदा दिल्लीला विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यानंतर केएल राहुल आणि संजीव गोएंकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये केएल राहुलने गोएंकाना इग्नोर केल्याचं दिसतंय.

गेल्या सिझनमध्ये झाला होता वाद

गेल्या सिझनमध्ये संजीव गोएंकाची टीम लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुल होता. या सिझनमध्ये एका सामन्यात झालेल्या पराभवानंतर गोएंकांनी मैदानावर येत केएल राहुलला चांगलंच झापलं होतं. याचा व्हिडीओ देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

केएल राहुलचं जशास तसं उत्तर?

गेल्या वर्षी व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये गोएंका संतापलेले असताना केएल राहुल मात्र शांत उभा राहून ऐकून घेत होता. यानंतर आयपीएल २०२५ पूर्वी केएल राहुलने लखनऊला अलविदा करत तो दिल्लीच्या टीममध्ये सामील झाला. अशातच २२ एप्रिल रोजी दिल्लीच्या टीमने लखनऊचा पराभव केला.

राहुल आणि अभिषेकने अर्धशतकी खेळी करत १६० रन्सचं टार्गेट सहजरित्या पूर्ण केलं. दरम्यान जिंकल्यानंतर गोएंका मैदानावर उतरून केएल राहुलला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी राहुलशी हात मिळवला आणि ते थांबून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी राहुल हात मिळवून पुढे निघाला. त्यांनी गोएंकांना इग्नोर केलं आणि पुढे चालू लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

केएल राहुल सध्या उत्तम फॉर्ममध्ये

आयपीएलच्या या सिझनमध्ये केएल राहुल उत्तम फलंदाजी करताना दिसतोय. एकाना स्टेडियममध्ये लखनऊच्या टीमने चांगली सुरुवात केली. मात्र पुढच्या क्रमातील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरीस लखनऊच्या पूर्ण टीमला केवळ १५९ रन्स करता आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT