kl rahul statement twitter
Sports

KL Rahul Statement: शतक झळकावण्यापूर्वी विराटबरोबर काय चर्चा झाली? सामन्यानंतर केएल राहुलचा खुलासा

KL Rahul On Virat Kohli: या सामन्यानंतर केएल राहुलने विराटच्या शतकी खेळीबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

KL Rahul Statement On Virat Kohli:

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील १७ वा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकहाती विजय मिळवला.

विराटच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय हा सामना ७ गडी राखून जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर केएल राहुलने विराट कोहलीच्या शतकी खेळीबाबत मोठा खुलासा केला आहे.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ९७ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली. विराट सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात होता. भारतीय संघाचा विजय समोर दिसत असताना विराटला शतक झळकावण्याची देखील संधी होती. त्यावेळी विराट कोहली एकेरी धाव घेत होता. मात्र केएल राहुलने त्याला धाव घेण्यापासून थांबवलं.

सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, " मी विराटला सांगितलं की आपण एकेरी धाव घेणं टाळायचं. त्यानंतर विराट म्हणाला की, आपण एकेरी धाव नाही घेतली तर लोकांना वाईट वाटेल. असं केल्यास लोकांना वाटेल की, वैयक्तिक विक्रमांसाठी खेळतोय. त्यानंतर मी त्याला म्हणालो की, आपण हा सामना सहत जिंकतोय तु तुझं शतक पूर्ण कर. मग शेवटी जाऊन त्याला हे पटलं.' त्यानंतर त्याने षटकार मारून शतक साजरं केलं. या शतकी खेळीसह भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सलग चौथा वियज साजरा केला. (Latest sports updates)

या विजयासह भारतीय संघाचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत. भारतीय संघाने गेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ८ गुणांसह न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी विराजमान आहे.

भारत आणि न्यूझीलंडचे गुण सारखेच आहेत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना २२ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना धर्मशाळेच्या मैदानावर खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT