KL Rahul statement after defeat against sunrisers hyderabad in shr vs lsg match amd2000 twitter
Sports

KL Rahul Statement: 'शब्दच नाहीये..', केएल राहुलने दारुण पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं?

SRH vs LSG, KL Rahul Statement: हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला केएल राहुल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरुद्ध १० गडी राखून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला की, आम्ही जरी २४० धावा केल्या असत्या तरीदेखील हैदराबादने हे आव्हान सहज गाठलं असतं.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर १६५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या बळावर १० गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार केएल राहुल? जाणून घ्या.

या सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, ' माझ्याकडे शब्दच उरले नाहीत. आम्ही टीव्हीवर अशी फलंदाजी पाहिली आहे. मात्र ही अविश्वसनीय फलंदाजी होती. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या मध्ये जाऊन लागत होता. त्यांचे स्किल्स अप्रतिम होते. दुसऱ्या डावात खेळपट्टीवर काय करावं याचा विचार करण्याची संधीच मिळाली नाही. त्यांना थांबवणं खूप कठीण होतं. कारण त्यांनी पहिल्याच चेंडूपासुन फटकेबाजी करायला सुरुवात केली.' (KL Rahul Statement)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' पराभूत झालेला संघ म्हणून आमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जातात. आम्ही ४० ते ५० धावा कमी केल्या. मात्र आम्ही २४० धावा केल्या असत्या तरी त्यांनी हे आव्हान गाठलं असतं. पावरप्लेमध्ये विकेट्स गेल्यानंतर आम्हाला हव्या त्या गतीने धावा करता आल्या नाहीत. आयुष आणि निकीने शानदार फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या १६६ पर्यंत पोहचवली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Crime: विद्यार्थ्यावर कधी कार, तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अत्याचार, गोळ्याही द्यायची; मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

SCROLL FOR NEXT