IND vs AFG T20 Series Saam Tv
Sports

Team इंडियाच्या दिग्गज ३ खेळाडूंचं नशीब रुसलं; T20च्या संघात येण्याचे दरवाजे झाले बंद

IND vs AFG T20 Series: केएल राहुल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्विन यांना अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी २० सामन्यांच्या मालिकेत डच्चू देण्यात आलाय. यातील तीन खेळाडूंसाठी टी- २० संघाचे दरवाजे बंद झाल्याचं सांगितलं जात आहे. टी-२० संघात पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान या खेळाडूंसमोर उभं राहिलंय.

Bharat Jadhav

kl rahul shreyas iyer And yuzvendra chahal :

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम संघाची घोषणा झालीय. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पुनरागमन झालंय. परंतु तीन भारतीय संघाच्या तीन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. केएल राहुल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन आश्विन या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाहीये.(Latest News)

दरम्यान या अय्यर, चहल आणि केएल राहुल या तिन्ही खेळाडूंचे टी-२० संघात पुनरागमन होणं आता कठिण झाल्याचं म्हटलं जात आहे. या तिघांसाठी टी२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. संघ व्यवस्थापन या तिघांना पर्याय शोधत असल्याचं सांगितलं जात आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि रवी अश्विन या खेळाडूंसाठी टी- २० संघाचे दरवाजे बंद झाल्याचे मानले जात आहे. यामुळे या तिघांसमोर पुनरागमन करण्याचं आव्हान उभं राहिलंय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज केएल राहुलसह श्रेयस अय्यरच्या स्ट्राईक रेटवर सातत्याने प्रश्न केले जात आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना टी २० संघात घेऊन त्यांना खेळण्याची संधी वेळोवेळी देण्यात आली. परंतु या दोघांना त्याचं सोनं करता आलं नाही. दोघांना त्यांच्या कामगिरी सुधारता आली नाहीये. या दोन्ही खेळाडूंची आकडेवारी पाहुया केएल राहुलने ७२ आंतरराष्ट्रीय टी- २० सामन्यांमध्ये १३९.१३च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. तर श्रेयस अय्यरचा स्ट्राइक रेट १३६.१३ आहे. यामुळे खेळाडूंसाठी पर्याय शोधले जात आहेत.

रवि बिश्नोई युजवेंद्र चहल आऊट

युजवेंद्र चहलसाठी पुनरागमन करणं एक आव्हान आहे. कारण युजवेंद्र चहलचा पर्याय म्हणून रवी बिश्नोईला समोर आणलं जात आहे. विकेट मिळवण्याची क्षमता रवी बिश्नोईकडे असल्यामुळे चहलची विकेट पडल्याचं सांगितलं जात आहे. आकडेवारीनुसार युजवेंद्र चहलने ८० टी- २० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने ८.१९ इकॉनॉमी आणि २५.०९ च्या सरासरीने ९६ विकेट घेतल्या आहेत. तर रवी बिश्नोईने २१ टी- २० सामन्यांमध्ये ७.१५ च्या इकॉनॉमीसह ३४ बळी घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT