kl rahul statement Saam tv news
Sports

KL Rahul Statement: गणित चुकलं राव! शतक हुकल्यानंतर केएल राहुलने सांगितला काय होता प्लान

India vs Australia, World Cup 2023: या सामन्यात केएल राहुलचं शतक ३ धावांनी हुकलं. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने आपल्या प्लानबाबत खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

KL Rahul Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली आहे. २०० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहली आणि केएल राहुलने १५० धावांपेक्षा अधिकची भागीदारी केली. दरम्यान केएल राहुलचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. या खेळीनंतर त्याने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सुरूवातीलाच भारतीय संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले.

त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी १६५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान विराट ८५ धावा करत माघारी परतला. तर केएल राहुलने नाबाद ९७ धावा करत संघाला सामना जिंकून दिला.

हा सामना झाल्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की,' ५० ओव्हर विकेटकिपिंग केल्यानंतर मी आंघोळ करून काही काळ विश्रांती घेईन असं ठरवलं मात्र विकेट्स पडल्यामुळे मला मैदानात उतरावं लागलं. विराटने काही काळ टेस्ट क्रिकेटसारखं खेळण्याचा सल्ला दिला, मात्र विजय निश्चित झाल्यानंतर मी आधी चौकार आणि नंतर षटकार मारून शतकासाठी प्रयत्न करत होतो. आता ते साध्य झालं नाही तरी पुढच्या सामन्यांमध्ये नक्की शतक ठोकेन' (Latest sports updates)

खेळपट्टीबाबत बोलताना केएल राहुल म्हणाला की,' ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी योग्य नव्हती.मात्र इतकी ही कठीण नव्हती. मला असं वाटतं की, क्रिकेटसाठी ही योग्य खेळपट्टी होती. दक्षिण भारतात, मुख्यत: चेन्नईमध्ये तुम्हाला अशीच खेळपट्टी मिळते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT