kl rahul hard to get chance in team india playing 11 in t20 world cup 2024 amd2000 twitter
क्रीडा

KL Rahul ला संघात तर स्थान मिळेल, पण प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण; हे आहे कारण

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात कोणाला स्थान मिळणार? यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान या सामन्यासाठी केएळ राहुलला संघात तर स्थान मिळेल. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे.

केएल राहुलला यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणूनही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवणं कठीण दिसून येत आहे. या स्पर्धेत यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. तर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीसारखे फलंदाज मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासह फिनिशर म्हणून रिंकू सिंग किंवा शिवम दुबेपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे केएल राहुलला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं जरा कठीण आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरी....

केएल राहुल आयपीएल २०२४ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करतोय. या संघाकडून खेळताना त्याने ६ सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने २०४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ अर्धशतक झळकावलं आहे. जर त्याला फलंदाज म्हणून या संघात स्थान मिळवायचं असेल तर त्याला आणखी जास्त जोर लावावा लागणार आहे. त्याला बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. यापूर्वी त्याने टी-२० वर्ल्ड २०२१,टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र या स्पर्धांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT