KKR vs SRH Players to watch out saam tv
Sports

KKR vs SRH, IPL Final: अभिषेक शर्मा ते सुनील नरेन; IPL फायनलमध्ये या ५ खेळाडूंच्या कामगिरीवर असतील साऱ्यांच्या नजरा

KKR vs SRH, Players To Watch Out: चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमन सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड असणार आहे. कारण या संघात सुनील नरेन आणि वरून चक्रवर्तीसारखे मॅचविनर गोलंदाज आहेत.

तर दुसरीकडे संपूर्ण हंगामात विस्फोटक फलंदाजी केलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार यात काहीच शंका नाही. दरम्यान दोन्ही संघात ५ असे खेळाडू आहेत जे आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात.

सुनील नरेन -

कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असेल तर सुनील नरेनवर मोठी जबाबदारी असणार आहे. संपूर्ण हंगामात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीने शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजी करताना त्याने १३ सामन्यांमध्ये ४८२ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजीतही त्याची धार पाहायला मिळाली आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये १६ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने शतकी खेळीही केली आहे.

अभिषेक शर्मा -

सनरायझर्स हैदराबादला आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असेल तर अभिषेक शर्माची बॅट तळपणं अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. त्यामुळे फायनलच्या सामन्यात त्याच्यावर चांगली सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

श्रेयस अय्यर -

हैदराबादला पराभूत करायचं असेल तर श्रेयस अय्यरला फलंदाजीसह चांगला प्लान घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. मध्यक्रमात त्याला विकेट सांभाळून धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सामन्यात जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. त्याने या हंगामातील १४ सामन्यांमध्ये ३४५ धावा केल्या आहेत.

पॅट कमिन्स -

सनरायझर्स हैदराबाद जर ही ट्रॉफी जिंकायची असेल कमिन्सला गोलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. कारण कर्णधार म्हणून तो उत्तम आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाला कमीत कमी धावांवर रोखण्यासाठी कमिन्सने विकेट्स काढून देणं अतिशय गरजेचं आहे.

हेनरिक क्लासेन -

हैदराबादला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर हेनरिक क्लासेनला मैदानावर टीचून फलंदाजी करावी लागेल. क्लासेनने आतापर्यंत खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT