Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Updates Twitter
क्रीडा

KKR vs SRH, IPL 2023: रिंकू-राणाने केकेआरचा डाव सावरला; हैदराबादला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Updates: कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर विजयासाठी १७१ धावांचं लक्ष ठेवलं आहे.

Satish Daud

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४७ वा सामना आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सुरू आहे. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष ठेवलं आहे.

केकेआरकडून नितीश राणाने ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने ४६ धावांची खेळी केली. याशिवाय आंद्रे रसेलने झटपट २४ धावा कुटल्या. हैदराबादकडून मार्को यान्सन आणि टी नटराजनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. (Latest sports updates)

तर भुवनेश्वर कुमार, एडन मार्करम, कार्तिक त्यागी आणि मयंक मार्कंडेयने प्रत्येकी १ गड्याला बाद केलं. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र, पावरप्लेमध्ये केकेआरची सुरूवात अतिशय खराब झाली. त्यांना पावरप्लेमध्ये ठराविक अंतरावर झटके बसले. डावाच्या (IPL 2023) दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्केने रेहमनुल्ला गुराबजला शुन्यावर बाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यर देखील ७ धावांवर बाद झाला.

सलग दोन धक्के बसल्यानंतर जेनस रॉय केकेआरचा डाव सावरत होता. मात्र त्याला कार्तिक त्यागीने २० धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. यानंतर रिंकू सिंह आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सारवला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेट्साठी ६२ धावांची भागिदारी केली.

मात्र, मोक्याच्या क्षणी मार्करमने राणाला बाद करत ही भागिदारी मोडली. नितीश राणाने ३१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. राणानंतर आंद्रे रसेल याने १५ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे रिंकू सिंगने चांगली फलंदाजी करत केकेआरला १५० धावांचा टप्पा पार करून दिला. रसेलला मार्कंडेयने बाद केलं. तर रिंकू सिंग अर्धशतकाजवळ असताना त्याला टी नटराजनने माघारी पाठवलं. रिंकूने ३५ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच केकेआरला निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा करता आल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT