KKR vs RR Jos buttler breaks the record of chris gayle of scoring most centuries in t20 cricket amd2000
KKR vs RR Jos buttler breaks the record of chris gayle of scoring most centuries in t20 cricket amd2000 twitter
क्रीडा | IPL

Jos Buttler Record: जोस द बॉस! KKR विरुद्ध शतक करताच मोडला ख्रिस गेलचा मोठा रेकॉर्ड

Ankush Dhavre

जोस बटलरने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. इडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या शतकी खेळीसह त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्याने सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेललाही मागे सोडलं आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत एकूण ८ शतकं झळकावली आहेत. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या स्थानी होता. ख्रिस गेलने ६ शतकं झळकावली होती. तर जोस बटलरच्या नावेही ७ शतकं झळकावण्याची नोंद होती. आता ७ शतकं झळकावत त्याने ख्रिस गेलला मागे सोडलं आहे. आता बटलरचं लक्ष विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असणार आहे. १ शतक झळकावताच त्याला विराटच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत विराट, बटलर आणि गेल नंतर केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. दोघांनी प्रत्येकी ४-४ शतकं झळकावली आहेत.

तसेच जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने टी -२० क्रिकेटमध्ये १६ शतकं झळकावली आहेत. तसेच या जोस बटलर आणि बाबर आझम यांचा देखील समावेश आहे. बटलरच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ८ शतकं झळकावली आहेत.

यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १ शतक करण्याची नोंद आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २२३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलरच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने हा सामना २ गडी राखून जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय; कार्यक्रमाचा होस्टही बदलला

Bachchu Kadu: 'सचिन तेंडुलकरच्या गेमिंग जाहिरातीमुळेच बॉडीगार्डचा मृत्यू', बच्चू कडू पुन्हा आक्रमक; घरासमोर आंदोलनाचा इशारा

Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलात पायलट होण्याची सुवर्णसंधी; तब्बल ३०४ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

KKR vs SRH,IPL Playoff: केकेआर नव्हे तर हैदराबादलाच मिळणार फायनलचं तिकीट! चक्रावून टाकणारी आकडेवारी एकदा पाहाच

Today's Marathi News Live : बिहारमध्ये भाजप आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

SCROLL FOR NEXT