kieron Pollard Boundary Great Caught Watch Video  Saam TV
क्रीडा

Sport News : पोलार्ड बनला सुपरमॅन, हवेत उडत पकडला अफलातून झेल; पाहा VIDEO

पोलार्डने सीमारेषेजवळ अफलातून झेल पकडला.

Satish Daud

नवी दिल्ली : कॅरेबियन प्रीमियर लीगला 31 ऑगस्टपासून सुरू झाली असून अनेक रोमांचक सामने (Cricket) पाहायला मिळत आहेत. गुरूवारी त्रिनबागो नाईट रायडर्स आणि सेंट लुसिया किंग्ज या दोन संघादरम्यान सामना खेळवण्यात आला. अतिशय रोमांचक सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट लुसिया किंग्जचा 3 विकेट्सने पराभव केला. (kieron Pollard Superman On The Boundary Great Caught Watch Video)

या सामन्यात त्रिनबागोचा कर्णधार कायरन पोलार्डने सीमारेषेजवळ अफलातून झेल पकडला. जेडेन सील्सने टाकलेल्या 20 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अल्झारी जोसेफने हवेत फटका मारला. हा चेंडू सीमारेषेपार (Sport) जाणार तोच पोलार्डने हवेत उडत झेल पकडला. पोलार्डचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नाणेफेक जिंकून त्रिनबागो संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकील हुसेनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर त्रिनबागोने लुसिया किंग्जला 143 धावांवर रोखले. किंग्जकडून रोशन प्राइमसने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. याव्यतिरिक्त मार्क डेलने 24 चेंडूत 35 धावांची चांगली खेळी खेळली. (Cricket Marathi News)

144 धावांचा पाठलाग करताना त्रिनबागोने 19.2 षटकात सामना जिंकला. त्रिनबागोसाठी टीओन वेबस्टरने शानदार खेळी खेळली. वेबस्टरने 45 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय टीम सिफर्टने 39 चेंडूत 34 धावा केल्या.

त्रिनबागो नाईट रायडर्सकडून गोलंदाजी करताना अकील हुसेनने 4 षटकात 13 धावा देत 4 बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला. या सामन्यात किरन पोलार्ड काही खास करू शकला नाही, तो 15 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT