Kidambi Srikanth saam tv
Sports

Korea Open: किदांबी श्रीकांतने गाठली कोरिया ओपन बॅडमिंटनची उपांत्य फेरी

जोनाटन क्रिस्टी आणि कुनलावुत विटिडसर्न यांच्यातील विजेत्याशी किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत लढेल.

साम न्यूज नेटवर्क

दक्षिण कोरिया : भारताच्या (india) बॅडमिंटनपटू (badminton) किदांबी श्रीकांतने (Kidambi Srikanth) आज कोरियातील खूल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची (Korea Open Badminton Championships 2022) उपांत्य फेरी गाठली. श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या सोन वान्होचा (Son Wanho) पराभव केला. एक तास दोन मिनिटं चाललेला हा सामना श्रीकांतने २१-१२, १८-२१, २१-१२ असा जिंकला. (Korea Open Badminton Championships 2022 Latest Marathi News)

सोन वान्होने २-० अशी आघाडी घेत आक्रमक सुरुवात केली परंतु जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने सलग पाच गुण मिळवत सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सोन वान्होने ६-२ अशी आघाडी घेत पुनरागमन केले. पण श्रीकांतने उत्तम खेळ करुन १२-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांत विजयी हाेईल असं वाटत असताना कोरियाच्या वान्होने २१-१८ असा सेट जिंकून सामना निर्णायकापर्यंत नेला.

तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये श्रीकांतने ४-० अशी आघाडी घेत सुरुवात केली. हा सेट श्रीकांतने २१-१२ असा आरामात जिंकला. उपांत्य फेरीत त्याची लढत जोनाटन क्रिस्टी (Jonatan Christie) आणि कुनलावुत विटिडसर्न (Kunlavut Vitidsarn) यांच्यातील विजेत्याशी होईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीचा थरकाप उडवणारा |Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT