devesh k and sarvesh k  Saam tv
क्रीडा

Khelo India Youth Games 2024: जुळ्या भावांची मोठी कमाल; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पटकावले दोन सुवर्णपदके

साम टिव्ही ब्युरो

Khelo India Youth Games 2024:

सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी यजमान तामिळनाडूने दोन सुवर्णपदके जिंकत खाते उघडले आहे. दोन जुळ्या भावांनी ही कमाल केली आहे. तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले आहे. (Latest Marathi News)

जुळ्या भावांची कमाल

देवेश के आणि सर्वेश के या दोन जुळ्या भावांनी राजरथिनम स्टेडियमवर मुलांच्या योगासन रिदमिक पेअर गटात पहिले सुवर्णपदक जिंकले. तर पश्चिम बंगालच्या मेघा मैती आणि उर्मी समता यांनी मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीएनपीईएसयू टेबल टेनिस हॉल येथे अँब्लेस गोविन एन ने मणिपूरच्या झेनिथ एसएचवर 15-11 असा विजय मिळवून मुलांच्या इपी सुवर्णपदकावर नाव कोरले. तर मुलींच्या सेबर फेन्सिंगमध्ये दिल्लीच्या खनक कौशिकने हरियाणाच्या हिमांशी नेगीचा 15-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

ओव्हिया सी आणि शिवानी डी यांनी मुलींच्या रिदमिक पेअर्स स्पर्धेत योगासन एरिनामधून यजमानांसाठी एकूण 128.32 गुणांसह कांस्यपदक जिंकले. तर फेन्सर जेफरलिन जेएस ने मुलींच्या सेबरमध्ये कांस्यपदक मिळवले.

दक्षिण भारतात प्रथमच आयोजित केल्या जात असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर यजमानांना याहून चांगली सुरुवात मिळाली नसती.

देवेश आणि सर्वेश यांनी 127.89 गुणांसह रिदमिक पेअर क्रीडा प्रकारात अव्वल स्थान मिळविण्यासाठी उत्कृष्ट समन्वय आणि स्थैर्य दाखवले. पश्चिम बंगालच्या अवरजित साहा आणि निल सरकार यांनी 127.57 गुणांसह रौप्य पदक तर महाराष्ट्राच्या खुश इंगोले आणि यज्ञेश वानखेडे (127.20 गुण) यांनी कांस्यपदक पटकावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

SCROLL FOR NEXT