Manasvi Choudhary
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीला वर्ल्डकप २०२३ मध्ये शानदार कामगिरी केल्याबद्दल अर्जुन अॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
मोहम्मद शमीने आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये शानदार कामिगिरी करत या पुरस्काराचा मान मिळवला आहे.
मोहम्मद शमी शिवाय तीरंदाज ओजस, प्रवीण देवताले, शीतल देवी आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्यासह एकूण २६ खेळाडूंना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकिरेड्डी यां स्टार बॅडमिंटन जोडीला २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मोहम्मद शमीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
क्रीडा रत्न खेळाडूंना २५ लाख रूपये बक्षिस तर अर्जुन आणि द्रोणाचार्य अॅवार्ड १५ लाख रूपये पुरस्कार आहे.
यावेळी अर्जुन पुरस्कार स्वीकारत असताना," मोहम्मद शमीने मेहनतीचे फळ मिळाले, जे नशिबात असते ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही" असे म्हटले.