Khalistani Pannu Saam Tv
Sports

Ind vs Eng: भारत-इंग्लंड कसोटीवर दहशतीचं सावट; खलिस्तानी पन्नूने दिली सामना रद्द करण्याची धमकी

Khalistani Pannu : शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने भारत आणि इंग्लंडचा कसोटी सामना न होऊ न देण्याची धमकी दिलीय.पन्नूकडे भारत आणि अमेरिकेचं नागरित्व आहे. व्हिडिओमध्ये त्याने इंग्लंड संघाला माघारी जाण्याची धमकीही दिलीय.पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हे दहशतवादी कृत्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

Khalistani Pannu Threat India England Test Match:

झारखंडची राजधानी रांचीमध्ये भारत आणि इंग्लंड क्रिकेट कसोटी सामना होणार आहे. या सामन्यावर दहशतीचं संकट ओढावले आहे. रांची येथे २३ फेब्रुवारीला होणारा भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामना रद्द करण्याची धमकी शीख फॉर जस्टिस संघटनेने दिलीय. गुरपतवंत सिंग पन्नू याने इंग्लंड क्रिकेट संघालाही माघारी जाण्याची धमकी दिलीय. दरम्यान याप्रकरणी रांची पोलिसांनी तपास सुरू केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.(Latest News)

झारखंडची राजधानी रांचीमध्ये भारत आणि इंग्लंड क्रिकेट कसोटी सामना होणार आहे. या सामन्यावर दहशतीचं संकट ओढावले आहे. रांची येथे २३ फेब्रुवारीला होणारा भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामना रद्द करण्याची धमकी शीख फॉर जस्टिस संघटनेने दिलीय. गुरपतवंत सिंग पन्नू याने इंग्लंड क्रिकेट संघालाही माघारी जाण्याची धमकी दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान याप्रकरणी रांची पोलिसांनी तपास सुरू केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी रांचीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलीय. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, शीख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू याने यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी केलाय.

यात त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट कसोटी सामना रद्द करण्यासाठी सीपीआय माओवादी या भारतातील प्रतिबंधित संघटनेला आवाहन केलंय. झारखंड आणि पंजाबमध्ये काही तरी कारवाई कराव्यात असं आवाहन या संघटनेला केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यांना सामना खेळू नका देऊ, असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलंय. शीख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाबचा रहिवासी आहे. मात्र तो सध्या अमेरिकेत राहतो. व्हिडिओमध्ये त्याने इंग्लंड संघाला माघारी जाण्याची धमकीही दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT