IPL 2025 स्पर्धा सुरु असताना गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मायदेशी परतला होता. त्यामुळे गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेला परतला होता. त्या वेळेस रबाडाने मायदेशी परतण्याचे कारण सांगितले नव्हते. वैयक्तिक कारण म्हणत तो मायदेशी गेला होता. यामागील खरे कारण त्याने काल (३ मे) सांगितले. प्रतिबंधित पदार्थ शरीरात सापडल्याने रबाडावर कारवाई करण्यात आली होती. रबाडावर बंदी घालण्यात आली. याच दरम्यान रबाडा भारतात येणार असून आयपीएल खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्सकडून आयपीएल २०२५ मध्ये खेळणारा रबाडा दक्षिण आफ्रिकेहून भारतात पोहोचला आहे. तो गुजरातच्या पुढील सामन्यात खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहवालानुसार, जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर तो ६ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात खेळू शकतो.
कागिसो रबाडाने आयपीएल २०२५ मध्ये गुजरातकडून खेळताना दोन सामन्यांमध्ये सहभाग घेतला. २ एप्रिल रोजी तो अचानक दक्षिण आफ्रिकेला गेला. मनोरंजनासाठी घेतल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन केल्याने रबाडावर कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे निलंबन टाकण्यात आले होते. या कारणामुळे रबाडा घाईघाईत मायदेशी परतला होता.
आता रबाडा गुजरात टायटन्सच्या संघात परतला आहे. पण तो पुढचा सामना खेळू शकेल की नाही हे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाशी सल्लामसलत केल्यानंतरच ठरवले जाईल. मनोरंजनात्मक ड्रग्सचे (recreational drug) सेवन केल्याप्रकरणी रबाडा दोषी ठरला होता. खेळाडूची कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांमध्ये या ड्रग्सचा समावेश होत नाही. त्यामुळे रबाडावर जास्तीत जास्त ३ महिने आणि कमीत कमी १ महिनावर बंदी घातली जाईल असे म्हटले जात आहे. रबाडाचा एका महिन्याचा सस्पेंशन पिरियेड संपल्याने त्याला मैदानात क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.