Josh Inglis Score 20 Runs In Jasprit Bumrah's Over x
Sports

4, 0, 6, 0, 4, 6..., जोश इंग्लिसकडून बुमराहची धुलाई, एकाच ओव्हरमध्ये मारले दमदार शॉट्स, यॉर्कर किंगनेही डोक्याला लावला हात, Video

Josh Inglis Score 20 Runs In Jasprit Bumrah's Over : क्वालिफायर २ सामन्यामध्ये जॉश इंग्लिसने जसप्रीत बुमराहची धुलाई केली. बुमराहच्या एकाच ओव्हरमध्ये इंग्लिसने दोन षटकार आणि दोन चौकार मारले.

Yash Shirke

MI Vs PBKS Qualifier 2 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि २० ओव्हर्समध्ये २०३ धावा केल्या. २०४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पंजाबचे सलामीवीर मैदानात उतरले. सामन्यात जोश इंग्लिसने जसप्रीत बुमराहची धुलाई केली. त्याने बुमराहच्या ओव्हरमध्ये २० धावा केल्या.

नेमकं काय झालं?

पंजाबचा प्रभसिमरन सिंह बाद झाल्यानंतर जोश इंग्लिस आणि प्रियांश आर्य यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. तेव्हा हार्दिकने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करण्यासाठी पाठवले. बुमराहने पाचव्या ओव्हरमध्ये जोस इंग्लिसने ४, ०, ६, ०, ४, ६ अशा प्रकारे तब्बल २० धावा केल्या. क्वालिफायर २ सारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात बुमराहला एकाच ओव्हरमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार मारल्याने जोश इंग्लिसचे कौतुक झाले.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे ११ शिलेदार आणि मुंबईचे सलामीवर मैदानात उतरणार तेवढ्यात पावसाची एन्ट्री झाली. ७.३० वाजता सुरु होणारा सामना लांबला गेला. त्यानंतर ९.४५ ला सामन्याला सुरुवात झाली.

मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये २०३ धावा केल्या. रोहित शर्मा लवकर बाद झाला. जॉनी बेअरस्टोने ३८ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी ४४-४४ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये १८ चेंडूत ३७ धावा करत नमन धीरने कमाल केली. २० ओव्हरमध्ये मुंबईची धावसंख्या २०० पार गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT