jos buttler instagram
Sports

Jos Buttler 104 Meter Six: जोस बटलरचा 104 मीटरचा षटकार अन् लाखोंचं नुकसान! VIDEOतून पाहा नेमकं काय घडलं?

Jos Buttler Six Video, ENG vs USA: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात १०४ मीटर लांब षटकार मारला.

Ankush Dhavre

गतविजेत्या इंग्लंडने नवख्या अमेरिकेला नमवत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने अमेरिकेवर १० गडी राखून विजय मिळवला आहे. यासह या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अमेरिकेने १८.५ षटकात ११५ धावा केल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने एकही फलंदाज गमावता ९.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने वादळी खेळी केली.

इंग्लंडकडून जोस बटलरची बॅट चांगलीच तळपली. त्याने ३८ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने मारलेला १ षटकार चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने मारलेल्या १०४ मीटरच्या षटकाराने लाखोंचं नुकसान केलं आहे. अमेरिकेची गोलंदाजी सुरु असताना तिसरे षटक टाकण्यासाठी सौरभ नेत्रावलकर गोलंदाजीला आला होता. त्यावेळी षटकातील चौथ्या चेंडूवर बटलरने स्टेपआऊट होऊन सौरभच्या डोक्यावरुन षटकार मारला. हा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला.

स्टेडियमच्या छतावर सोलार पॅनेल लावण्यात आले होते. मात्र चेंडू लागल्याने या सोलार पॅनेलला तडा गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. बटलरने खेचलेल्या या १०४ मीटरच्या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

इंग्लंडचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

अमेरिकेला पराभूत करत इंग्लंडने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह इंग्लंडचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर स्पर्धेतील सेमिफायनलच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियालाही सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT