Sachin Tendulkar Test Record Latest News SAAM TV
Sports

रोहित शर्मा- विराट कोहली नव्हे, हा फलंदाज मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम आजही कुणी मोडू शकलेला नाही.

Nandkumar Joshi

मुंबई: एजबेस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर सात विकेट राखून विजय मिळवला होता. या पराभवामुळं १५ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचं टीम इंडियाचे स्वप्न अपूर्ण राहिलं. जॉनी बेयरस्टो आणि जो रूट हे दोघे इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी शतके ठोकून ३७८ धावांचे भारताने दिलेले लक्ष्य सहज पार केले.

जॉनी बेयरस्टो आणि जो रूटच्या फलंदाजीचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने रूटच्या बाबतीत भविष्यवाणी केली आहे. कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम जो रूट मोडू शकतो, असे वसीम जाफर म्हणाला.

जाफर काय म्हणाला?

वसीम जाफरने एका क्रीडा वृत्तसंस्थेला सांगितले की, जर रूट असाच खेळत (Cricket News) राहिला तर तो ही कामगिरी करू शकतो. रूट आता ३१ वर्षांचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की इंग्लंडच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं करिअर खूप मोठं नसतं. मात्र, रूट हा पुढील पाच ते सहा वर्षे असाच खेळत राहिला तर, सचिनचा विक्रम तो मोडू शकतो, असं जाफर म्हणाला.

कोहली आणि स्मिथला टाकले मागे

भारताविरोधात बर्मिंगहॅम कसोटीत जो रूटने खास अशी कामगिरी केली. रूटने २८ वे शतक करून हाशिम अमला आणि मायकल क्लर्कच्या शतकांशी बरोबरी केली. इतकेच नाही तर अव्वल स्थानी असलेल्या जो रूटने विराट कोहली (Virat Kohli) आणि स्मिथलाही मागे टाकले. या दोघांनी प्रत्येकी २७ शतके केली आहेत.

सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा

जो रूटने आतापर्यंत १२१ कसोटी सामन्यांमध्ये ५० हून अधिकच्या सरासरीने १०४५८ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी रूटला जवळपास साडेपाच हजार धावा कराव्या लागणार आहेत. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३ हून अधिकच्या सरासरीने १५९२१ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Road Accident : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर; वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलन

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा

SCROLL FOR NEXT