joe root catch video  saam tv
Sports

Joe Root Catch Video: जो रूटने टिपला कोहलीपेक्षाही खतरनाक कॅच; VIDEO पाहायलाच हवा

England vs Australia 5th Test: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Joe Root Catch In Ashes: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील अंतिम कसोटी सामना केनिंगग्टन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा संघ १२ धावांनी आघाडीवर आहे. दरम्यान या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

जो रूटने टिपलेल्या या झेलचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

ज्यात तुम्ही पाहू शकता की, मार्क वूडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये असलेल्या रूटने मार्नस लाबुशेनचा झेल टिपला आहे. हा झेल सोपा मुळीच नव्हता. कारण त्याने डाव्या बाजूला डाईव्ह मारत हा झेल टिपला.

जो रूटच्या या झेलसह मार्नस लाबुशेनचा डाव अवघ्या ९ धावांवर संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या रुपात दुसरा गडी गमावला.

इंग्लंडकडून ४३ वे षटक टाकण्यासाठी मार्क वूड गोलंदाजीला आला होता. त्यावेळी या षटकातील पाचव्या चेंडूवर रूटने हा झेल टिपला. (Latest sports updates)

दोन्ही संघ बरोबरीत...

अॅशेस मालिकेतील ५ व्या कसोटीतील २ दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव २८३ धावांवर आटोपला आहे.

इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने ४, टॉड मर्फीने २, जोश हेजलवूडने २ गडी तर मिचेल मार्श आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव २९५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT