Jhulan Goswami equals World Record Saam tv
क्रीडा

World Cup: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झुलन गोस्वामीनं 'या' विश्वविक्रमाशी केली बरोबरी

झुलन गोस्वामीने शेवटच्या षटकात बळी घेतला.

साम न्यूज नेटवर्क

हॅमिल्टन : भारताच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आज (गुरुवार) आयसीसी महिला विश्वकरंडक (ICC Womens World Cup) स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या गुणसंख्येची बरोबरी केली. गोस्वामीनं ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टनची आज बराेबरी केल्यानं तिच्यावर काैतुकाचा वर्षाव हाेऊ लागला आहे. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या (australia) लिन फुलस्टनच्या ३९ बळींच्या संख्येशी आज गाेस्वामीनं बरोबरी केली. (ICC Women's World Cup 2022 latest marathi news)

हॅमिल्टन येथे चालू असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वकरंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेत झुलनने न्यूझीलंडविरुद्ध (new zealand) ही कामगिरी केली. आज तिने शेवटच्या षटकात विक्रमी बळी घेतला. गोस्वामीने केटी मार्टिनला (Katey Martin) बाद केले.

भारताच्या (india) सुरुवातीच्या सामन्यात देखील तिने शानदार गोलंदाजी केली. दोन दशकांच्या कारकिर्दीत गोस्वामीने २००५ पासून पाच महिला क्रिकेट विश्वकरंडकमध्ये ३९ गडी बाद केले. दरम्यान सेडन पार्क येथे सुरू असलेल्या आजच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला २६०/९ मध्ये रोखले आहे. पूजा वस्त्राकरने (Pooja Vastrakar) चार तसेच राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gayakwad) दोन गडी बाद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT