jay shah yandex
Sports

IPL Impact Player Rule: आयपीएलमधून इम्पॅक्ट प्लेअर नियम गायब होणार? जय शहा काय म्हणाले?

Jay Shah On Impact Player Rule: गेल्या २ हंगामेपासून आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्यात आला आहे. मात्र काहींनी या नियमाला विरोध केला होता. आता जय शहा यांनी या नियमाबाबत भाष्य केलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेत अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. गेल्या २ हंगामापासून या स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम लागू केल्यामुळे अनेकांनी टीका देखील केली आहे. आता आयपीएल २०२५ स्पर्धेची चर्चा सुरू असताना, बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाच्या भविष्यावर भाष्य केलं आहे.

जय शहा यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत बोलताना त्याचे फायदे आणि तोटेही सांगितले. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळणं कठीण आहे. मात्र याच नियमामुळे आणखी एका भारतीय खेळाडूला जागा मिळते. याचा फायदा म्हणजे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, असं जय शहा म्हणाले.

काय म्हणाले जय शहा?

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जय शहा म्हणाले की, ' नुकताच आमची आयपीएल फ्रेंचायझींच्या मालकांशी चर्चा झाली. या बैठकीत इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबतही चर्चा करण्यात आली. या नियमाचे फायदे आणि तोटेही आहेत. या नियमाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना जास्त संधी मिळत नाही. तर फायदा असा की, एका भारतीय खेळाडूला स्वतः ला सिद्ध करण्याची संधी मिळते. ब्रॉडकास्टर्स यावर भरपूर खर्च करत आहेत. मात्र एक प्रशासक म्हणून माझ्यासाठी खेळ जास्त महत्वाचा आहे. आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊ.'

काय आहे इम्पॅक्ट प्लेअर नियम?

इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फायदा दोन्ही संघांना होतो. या नियमानुसार दोन्ही संघांना अतिरिक्त १-१ खेळाडू खेळवण्याची संधी मिळते. फलंदाजाची गरज असल्यास फलंदाजाचा संघात समावेश केला जातो. तर गोलदाजाची गरज असल्यास गोलंदाजाला संघात संधी दिली जाते. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंना स्थान मिळणं कठीण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा बँक निवडणुकीत मातब्बर नेत्यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; सहा माजी संचालकांचे याचिका फेटाळली

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माघार

IAS Transfer: १६ IAS अधिकाऱ्यांसह ५ जिल्हाधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या, प्रशासनात मोठा फेरबदल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

Cancer : उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊनही पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT