Jasprit Bumrah google
Sports

ICC Mens Test Cricketer of The Year: जसप्रीत बुमराह ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईअर, बनला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah Won ICC Mens Test Cricketer of The Year: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 च्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. हा विक्रम नोंदवणारा बुमराह सहावा भारतीय ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ICC चॅम्पियन्स ट्रॅाफी सुरु होण्यापूर्वी भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 च्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हा पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे.

जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याने दमदार खेळ दाखवला होता.आतापर्यंत एकूण सहा खेळाडूंनी देशासाठी हा विशेष सन्मान मिळवला आहे. ज्यामध्ये राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये विशेष सन्मान मिळवणारा बुमराह हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आहे.

२०२४ मध्ये बुमराहची दमदार कामगिरी

२०२४ मध्ये बुमराहने आपल्या दमदार कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले. बुमराहने अलीकडेच कसोटीत 200 विकेट्स पूर्ण केले होते. बुमराह 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 14.92 च्या सरासरीने आणि 30.16 च्या स्ट्राइक रेटने 71 विकेट घेतल्या. जे कसोटी फॉरमॅटमधील कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

71 विकेट्स घेतल्यानंतर, बुमराह एका कॅलेंडर वर्षात 70 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला. आयसीसीने पर्थमधील बुमराहच्या मॅच बदलणाऱ्या स्पेलला त्याच्या सर्वात स्मरणीय कामगिरीपैकी एक मानले, ज्यामुळे भारताला 295 धावांनी विजय मिळवण्यात मदत झाली.

दिग्गजांच्या यादीत बुमराहचा समावेश

२०२४ मध्ये बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. जसप्रीत बुमराह (ICC Test Cricketer Of The Year) आयसीसी कसोटी क्रिकेटपटूचा मान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. याआधी भारतीय फलंदाज राहुल द्रविड याने हा सन्मान मिळवला होता. भारताकडून पहिल्यांदाच राहुल द्रविडला ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअरचा विशेष पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2009 मध्ये गौतम गंभीर, 2010 मध्ये वीरेंद्र सेहवाग, 2016 मध्ये रविचंद्रन अश्विन, 2018 मध्ये विराट कोहली आणि आता 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने हा पुरस्कार जिंकला आहे.

पुरस्कार जिंकल्यावर बुमराहने व्यक्त केला आनंद

(ICC Mens Test Cricketer of The Year) आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला 'मला वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाल्याने खरोखरच आनंद झाला आहे. हा फॉरमॅट नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि मला नेहमीच कसोटी क्रिकेट खेळायचे होते. त्यामुळे मला खूप आनंद झाला. या वर्षात भरपूर कसोटी क्रिकेट खेळल्याचा आणि अनेक विकेट्स घेतल्याचा मला खरोखर आनंद झाला आहे. पण विझागमधील ओली पोपची विकेट माझ्यासाठी सर्वात खास होती. त्या विकेटमुळे सामन्याचा वेग बदलला होता'.

Edited By: Priyanka Mundinkeri

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT