jasprit bumrah will comeback devdutt padikkal may get debut in india vs england 5th test know team india plan twitter
क्रीडा

Team India News: जसप्रीत बुमराहचं कमबॅक, या प्रमुख खेळाडूंना विश्रांती! अंतिम कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशाळेत रंगणार आहे.

Ankush Dhavre

Team India Plan For IND vs ENG 5th Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशाळेत रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. मालिका जिंकल्यामुळे अंतिम कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. संघातील काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. हा निर्णय वर्कलोड मॅनेज करण्यासाठी घेतला जाऊ शकतो. मात्र कोणते खेळाडू बाहेर बसणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बाहेर बसणाऱ्या खेळाडूंमध्ये गोलंदाज आणि फलंदाजाचांही समावेश असू शकतो.

हा दिग्गज गोलंदाज करणार कमबॅक..

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. मात्र अंतिम कसोटीत तो कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. या मालिकेत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक गडी बाद केले आहेत. बुमराह येत असल्याने भारतीय संघाची ताकद दुपटीने वाढणार आहे. (Cricket news in marathi)

हा खेळाडू बसणार..

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. तो या सामन्यात कमबॅक करणार आहे. त्यामुळे रोहितला विश्रांती दिली जाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. ही मालिका झाल्यानंतर रोहित शर्मा आयपीएल स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी रोहितला अंतिम कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

काय आहे भारतीय संघाचा प्लान?

हा सामना ७ मार्चपासून रंगणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, दोन्ही संघ धरमशाळेत केव्हा दाखल होणार? तर मिळालेल्या माहितीनुसार, सर्व खेळाडू २ मार्च रोजी चंडीगडमध्ये एकत्र येणार आहेत. इथून दोन्ही संघ ३ मार्च रोजी धरमशाळेला रवाना होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT