Jasprit Bumrah saam tv
Sports

Jasprit Bumrah: बुमराहच्या जागी २९ वर्षांच्या गोलंदाजाला मिळाली संधी, या कारणामुळे मिळाली संधी?

India Test Squad: जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टेस्ट तून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डारची भारतीय संघात निवड केली असून त्याला प्रथमच वरिष्ठ टेस्ट संघात संधी मिळाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे निवड समितीने त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डार याची भारतीय टेस्ट टीममध्ये निवड केली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या वनडे सिरीजदरम्यान बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याला श्रीलंका दौऱ्यातून बाहेर ठेवण्यात आलंय. टीम इंडिया श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वीच निवड समितीने आकिब नबीला संधी देण्याचा निर्णय घेतला.

आकिब नबी डराला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ टीममध्ये स्थान मिळालंय. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट सामन्यापूर्वी तो टीमसोबत होता. मात्र प्लेईंग ११ मध्ये त्याची निवड झाली नव्हती.

रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी

आकिब नबीने गेल्या दोन रणजी ट्रॉफी सिझनमध्ये एकूण 104 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी 2025-26 च्या सिझनमध्ये त्याने तब्बल 60 फलंदाजांना बाद केलं. जम्मू-काश्मीरला इतिहासातील पहिलं रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर तो इंडिया 'ए' टीमचाही सदस्य होता. त्या दौऱ्यातील दोन प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने सहा विकेट्स मिळवल्या होत्या.

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि आकिब नबी डार.

पहिल्या टेस्टमध्ये मिळणार संधी?

टीममध्ये निवड झाली असली तरी पहिल्याच टेस्टमध्ये आकिब नबीला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. कारण वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर बराड यांना आघाडीवर मानलं जातंय. मात्र सराव सामन्यात आकिब नबीने प्रभावी गोलंदाजी केली आणि गुरनूर बराडपेक्षा चांगली कामगिरी केली तर त्यालाही पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT