jasprit bumrah yandex
Sports

Jasprit Bumrah: टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy ला मुकणार?

Jasprit Bumrah Injury Update: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेपूर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मर्यादीत षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने पाठीच्या दुखण्यामुळे मैदान सोडलं होतं. तो सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नव्हता.

जसप्रीत बुमराहला विश्रांती?

बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकं टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. पाचव्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी तो मैदान सोडून स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता. त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याची ही दुखापत गंभीर असेल, तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावं लागू शकतं.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराहला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह भारतीय संघात असणं अतिशय महत्वाचं आहे.

बॉर्डर- गावसकर मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. यासह भारताला जर ही स्पर्धा जिंकायची असेल, तर जसप्रीत बुमराहशिवाय पर्याय नाही. त्याला नेमकी काय दुखापत झालीये, हे अजूनही कळू शकलेलं नाही.

जसप्रीत बुमराहला पूर्णपणे फिट व्हायला किती वेळ लागेल?

जर बुमराहची दुखापत ही ग्रेड १ ची असेल, तर त्याला पूर्णपणे फिट व्हायला कमीत कमी २ ते ३ आठवड्यांचा अवधी लागू शकतो. जर ग्रेड २ ची दुखापत असेल, तर त्याला पूर्णपणे फिट व्हायला कमीत कमी ६ आठवडे लागतील. जर ग्रेड ३ ची दुखापत असेल, तर फिट व्हायला कमीत कमी ३ महिन्यांचा अवधी लागतो. आता बुमराहची इंजरी कुठल्या ग्रेडची आहे, हे लकवरच समजेल.

कसा असेल दौरा?

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या कामाची बातमी! ₹3000 खात्यात जमा झाले नसतील तर…

डायबिटीजवर बिनपैश्याचा उपाय, रोज सकाळी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या फायदे

RCB vs GT: रजत पाटीदारचा षटकार पाहून भारावला विराट कोहलीही; एकटक पाहतच राहिला! व्हिडिओ व्हायरल

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय, बचत गटाला फायदाच फायदा, पाहा नेमका प्लॅन काय?

लग्नातून समाजसेवेचा अनोखा पॅटर्न; विमा काढून गावकऱ्यांनाच दिला लग्नाचा आहेर

SCROLL FOR NEXT