India vs England 3rd test BCCI/X
Sports

India vs England 3rd Test Day 2 scorecard update : जसप्रीत बुमराहचा जबरा 'पंच'; इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी धुव्वा, ३८७ धावांवर गारद

India vs England 3rd Test Score Update : पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत असलेल्या इंग्लंडची फलंदाजी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यानं दुसऱ्या दिवशी खिळखिळी केली. मैदानात नांगर टाकून बसलेल्या जो रूटचे स्टंप उखडून बुमराहनं इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. बुमराहनं घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर इंग्लंडला ३८७ धावांवर रोखलं.

Nandkumar Joshi

इंग्लंडनं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय पथ्यावर पडला. नितीश कुमार रेड्डीनं एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र, संयमी फलंदाजी करत इंग्लंडनं डाव रचला. कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडनं आपल्या नावावर करत भारताला बॅकफूटवर ढकललं. जो रूटच्या (९९ धावा, नाबाद) दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या दिवस अखेर ४ बाद २५१ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं.

इंग्लंडच्या २६० धावा फलकावर असतानाच जसप्रीत बुमराहनं बेन स्टोक्सची विकेट घेत पहिला दणका दिला. पहिल्या दिवशी फारसं यश हाती न आलेल्या बुमराहनं दुसऱ्या दिवशी वसुली करत विकेटचा 'पंच' लगावला. इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडचा पहिला डाव

पहिल्या दिवशी इंग्लंडनं कसोटीवर वर्चस्व निर्माण केलं होतं. जो रूटनं जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या दिवसअखेरपर्यंत तो नाबाद ९९ धावांवर होता. तर त्याला बेन स्टोक्सनं सुरेख साथ दिली होती. तो ३९ धावांवर नाबाद होता. इंग्लंडनं दिवसअखेर ४ बाद २५१ धावा केल्या होत्या.

धावफलक

इंग्लंडचा पहिला डाव

झॅक क्रॉली - १८ , बेन डकेट २३ धावा

ओली पोप - ४४ धावा, जो रूट - १०४ धावा

हॅरी ब्रुक - ११ धावा, बेन स्टोक्स - ४४ धावा

जेमी स्मिथ - ५१ धावा, ख्रिस वोक्स - ०

कार्स - ५६ धावा, जोफ्रा आर्चर - ४ धावा

शोएब बशीर - नाबाद १

भारतीय गोलंदाजांची कामगिरी

जसप्रीत बुमराह - ७४ धावा, ५ विकेट्स

आकाश दीप - ९२ धावा, ० विकेट

मोहम्मद सिराज - ८५ धावा, २ विकेट

नितीश कुमार रेड्डी - ६२ धावा, २ विकेट

रविंद्र जडेजा - २९ धावा, १ विकेट

वॉशिंग्टन सुंदर - २१ धावा, ० विकेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT