Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Jasprit Bumrah five-wicket hauls: जसप्रीत बुमराहने लॉर्ड्सच्या मैदानावर टेस्ट कारकिर्दीतील पहिले पाच बळी (five-wicket haul) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत घेतले आहेत. यामुळे त्याने अजून एका विक्रमाला गवसणी घातलीये.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrahsaam tv
Published On

सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सुरु आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर या ट्रॉफीतील तिसरा सामना खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लीड्स टेस्टमध्ये ५ विकेट्स घेणाऱ्या बुमराहने आता लॉर्ड्सच्या मैदानावरही इंग्लंडच्या फलंदाजीची धुलाई केली आहे. यासोबतच त्याने स्वतःच्या नावावर काही खास विक्रमही केले आहेत. या मैदानावर ५ विकेट्स घेणारा १५वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

७ चेंडूंमध्ये इंग्लंडची बॅटिंग ढासळली!

या सामन्याच्या पहिल्या दिवशी बुमराहने केवळ एकच विकेट घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मैदानात आल्यानंतर बुमराहने आक्रमकता दाखवत इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडलं. या सामन्यात बुमराहने पहिल्यांना बेन स्टोक्सला बोल्ड करत सामन्याला कलाटणी दिली.

त्याच ओव्हरमध्ये पुढच्याच बॉलवर क्रिस वोक्सची विकेट्स घेतली आणि थोड्याच वेळात इंग्लंडचा शतकवीर जो रूटलाही तंबूत परत पाठवलं. मुख्य म्हणजे जसप्रीत बुमराहने ही तीन विकेट्स सात चेंडूंच्या आत घेतल्या आहेत.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

या लॉर्ड्स टेस्टमध्ये ५ विकेट्स घेतल्यानंतर बुमराहने इंग्लंडविरुद्ध एकूण ५ वेळा 'फाइव विकेट हॉल' पूर्ण केलंय. त्याची ही कामगिरी कोणत्याही टीमविरुद्ध त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ४ वेळा हे यश मिळवलंय. याशिवाय इंग्लंडविरुद्ध त्याचे सर्वाधिक टेस्ट विकेट्सही झाल्या आहेत.

Jasprit Bumrah
Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

बुमराहचं स्वप्नही होणार आता पूर्ण

या पाच विकेट्समुळे बुमराहला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक ‘ऑनर बोर्ड’वर आपलं नाव कोरण्याची संधी मिळाली आहे. हे बोर्ड त्या खेळाडूंना गौरव देतो, ज्यांनी लॉर्ड्सवर टेस्ट सामन्यात शतक किंवा ५ विकेट्सचा टप्पा गाठलेला असतो. या बोर्डवर नाव असणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरसुद्धा लॉर्ड्सवर शतक झळकावू शकला नाही, त्यामुळे त्याचं नाव ऑनर बोर्डवर नाही.

Jasprit Bumrah
Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

मुथैया मुरलीधरनला टाकलं मागे

बुमराहने लॉर्ड्समध्ये ही कामगिरी करताच, क्रिकेट इतिहासातील महान गोलंदाज मुथैया मुरलीधरन याचा एक विक्रम मागे टाकला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अकरम याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com