japan vs monoglia t20i series mongolia team got all out on just 12 runs lowest totals in t20i amd2000 twitter
Sports

Japan vs Mongolia: विश्वासच बसेना! ६ फलंदाज शून्यावर बाद ; स्कोअरबोर्ड पाहून डोकं चक्रावून जाईल

Lowest Totals In T-20 Cricket: टी-२० क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांची चांदी होते. कारण १२० चेंडूंचा सामना करताना फलंदाज प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहचवण्याच्या प्रयत्नात असतात.

Ankush Dhavre

टी-२० क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांची चांदी होते. कारण १२० चेंडूंचा सामना करताना फलंदाज प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहचवण्याच्या प्रयत्नात असतात. आयपीएल २०२४ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाने टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. तर दुसरीकडे एका आतंरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली आहे.

सध्या मंगोलियाचा संघ जपान दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ७ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या सामन्यात मंगोलिया संघातील ६ फलंदाज शून्यावर बाद होऊन माघारी परतले. तर ४ फलंदाज २,१,२, आणि ४ धावा करत माघारी परतले. तर ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला फलंदाज शून्यावर नाबाद परतला. मंगोलियाचा संपूर्ण संघ अवघ्या १२ धावांवर आटोपला. ही टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना जपानच्या फलंदाजांनी मंगोलियाच्या गोलदांजांची धुलाई केली आहे. जपानने २० षटकअखेर ७ गडी बाद २१७ धावा केल्या. या डावात ६९ धावांची खेळी करणारा फलंदाज सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला. या धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा डाव अवघ्या १२ धावांवर आटोपला. जपानने हा सामना ६८ चेंडू शिल्लक ठेऊन २०५ धावांनी जिंकला.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या...

ही टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये आइल ऑफ मेन संघाचा डाव अवघ्या १० धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करतानात स्पेन संघाने २ चेंडूत हा सामना जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

SCROLL FOR NEXT