भारतीय ऑलिंपिक पात्र खेळाडूंसाठी जपानची नवी नियमावली
भारतीय ऑलिंपिक पात्र खेळाडूंसाठी जपानची नवी नियमावली - Saam TV
क्रीडा | IPL

भारतीय ऑलिंपिक पात्र खेळाडूंसाठी जपानची नवी नियमावली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जपानमध्ये Japan होणाऱ्या ऑलिंपिक Olympics स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय India खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी जपान सरकारने कठोर तरतुदी जारी केल्या आहेत. जपान सरकारच्या म्हणण्यानुसार, या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना येथे जाण्यापूर्वी आठवडाभर दररोज कोरोना Corona चाचणी घ्यावी लागणार आहे. आणि जपानमध्ये पोहोचल्यानंतर तीन दिवस इतर कोणत्याही देशातील खेळाडूंना तसेच स्थानिक लोकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) IOA या तरतुदींवर कडक प्रतिक्रिया दिली आहे. Japan Frames new rules for Indian Olympic Players

टोकियोला आगमन झाल्यानंतर १४ दिवसांसाठी कोरोनाचे विविध प्रकार सापडलेल्या भारतासह ११ देशांमधून जपानला जाणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तसेच प्रवासी यांच्यावर जपान सरकारने कडक सूचना दिल्या आहेत.भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) याला एक अन्यायकारक आणि भेदभाव करणारे नियम म्हटले आहे.

हे देखिल पहा

आयओएच्या मते, भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. काही आठवड्यांपूर्वी पर्यंत, दररोज ३ लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविली जात होती, जी आता ६० हजारांवर आली आहेत. दरम्यान वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू विनेश फोगट आणि भाला फेकणारा नीरज चोपडा हे परदेशात प्रशिक्षण घेत आहेत आणि तेथून ते टोकियो येथे पोचतील.त्यामुळे त्यांच्यावर सदर नियम लागू नसतील.

प्रत्येक देशाला स्वतःचा देश सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे,आणि आम्ही त्याचा आदरही करतो परंतु,लसीकरण पूर्ण झालेल्या व यापूर्वीच अनेक कोरोना चाचण्यांमधून गेलेल्या खेळाडूंवरील ही नियमावली अन्यायकारक व भेदभाव करणारी आहे."

असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे म्हणणे आहे.

जपान सरकारने जारी केलेल्या सूचना

- अफगाणिस्तान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान,श्रीलंका आणि भारत यांना गट १ मध्ये स्थान.

- ग्रुप १ मधील देशांना जपान प्रवास करण्यापूर्वी आठवडाभर दररोज कोरोना चाचणी करावी लागेल.

- जपानला पोचल्यानंतर एका आठवड्यासाठी शिष्टमंडळासह देशांतील खेळाडूंना इतरांपासून दूर रहावं लागेल.

- तसेच खेळाडू आणि अधिकाऱ्यांना इतर देशातील खेळाडू किंवा प्रतिनिधीमंडळांसह कोणासही तीन दिवस भेटण्याची नसेल.

- खेळांच्या दरम्यान दररोज खेळाडू आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाईल.

- खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्याच्या केवळ पाच दिवस आधी टोकियोत पोचता येईल.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने उपस्थित केलेले प्रश्न

- तीन दिवसांच्या कठोर विलगीकरणात खेळाडू व अधिकारी यांच्या न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याचे आयोजन कसे केले जाईल?

- लसीकरणासह अनेक कोरोना चाचण्या यापूर्वीच झालेल्या खेळाडूंवर निर्बंधांची गरज काय?

- जर खेळाडूंच्या खोल्यांमध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे पोचविण्याची व्यवस्था केली गेली तर, प्रथिने, खाद्यान्न यासारख्या त्यांच्या शारीरिक गरजांसाठी योजना कोण तयार करेल?

- स्पर्धेच्या केवळ पाच दिवस आधी योग्य आहार घेत नसलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर याचा परिणाम होणार नाही काय?

- भारतीय खेळाडू कोठे आणि केव्हा सराव करतील? कारण मैदाने रिकामीच नसतात.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT