ishan kishan  yandex
Sports

Ishan kishan News: इशान किशनबाबत मोठी अपडेट ! BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून करणार बाहेर?

Ishan Kishan Latest Update: इतके दिवस इशान किशन कुठे आहे? काय करतोय? याबाबत कोणालाच काहीच माहीत नव्हतं. आता त्याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Ishan Kishan News In Marathi:

भारतीय संघाचा स्टार खेळाडू इशान किशन सध्या संघाबाहेर आहे. तो नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान तर मिळालं मात्र प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. इतके दिवस इशान किशन कुठे आहे? काय करतोय? याबाबत कोणालाच काहीच माहीत नव्हतं. .

मात्र आता इशान किशन कुठे आहे याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, इशान किशन सध्या बडोद्यात असून किरण मोरे क्रिकेट ॲकेडमीत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबत सराव करतोय. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. इशान किशन देखील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

केव्हा करणार कमबॅक?

असं म्हटलं जात आहे की, इशान किशन थेट आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक करू शकतो. मात्र याबाबत त्याने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बीसीसीआय आणि हेड कोच राहुल द्रविडलाही याबाबत कुठलीही कल्पना नाही. (Cricket news in marathi)

राहुल द्रविडला जेव्हा इशान किशनच्या कमबॅकबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने म्हटले होते की, ' इशानला क्रिकेटमधून ब्रेक हवा होता. त्याला केव्हा कमबॅक करायचं हे त्यानेच ठरवावं. त्याआधी त्याला कुठल्याही प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल.

बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करणार?

सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो झारखंडचं प्रतिनिधित्व करतो. मात्र त्याने झारखंड क्रिकेट बोर्डलाही रणजी ट्रॉफी न खेळण्याबाबत कुठलीही कल्पना दिलेली नाही. याचा परिणाम त्याच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर होऊ शकतो. सध्या तो सी कॅटेगरीमध्ये आहे. क्रिकेटपासून दूर राहणं त्याला महागात पडू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT