Men's Cricket Team Central Contract  Saamtv
Sports

Cricket News: ईशान किशन BCCIच्या करारातून Out होणार? 'या' तीन खेळाडूंची होणार एंट्री

Men's Cricket Team Central Contract: टी२० विश्व कप आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे आता अक्षर 'बापू'चं प्रमोशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहली अ दर्जाच्या करारात कामय राहणार आहेत. दोन्ही खेळाडूंनी टी२० मधून निवृत्ती घेतली आहे. तरीही ते बीसीआयच्या करारात कायम असणार आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरचा पुन्हा बीसीसीआयच्या कराराच्या यादीत समावेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

गेल्या वर्षी श्रेयस अय्यरसह यष्टिरक्षक आणि फलंदाज इशान किशनही बीसीसीआयच्या करारातून बाहेर गेला होता. हे दोन्ही खेळाडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करारावर परतण्याची प्रतीक्षा करत आहेत. तर T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू अक्षर पटेलचं प्रमोशन होणार आहे. अक्षर पटेलची भारतीय संघात एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

मागील वर्षात भारतासाठी शानदार प्रदर्शन करणारा वरुण चक्रवती, नितीश कुमार रेड्डी आणि अभिषेक शर्मा यांची बीसीसीआयच्या करारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात BCCI ने 2024/25 हंगामासाठी भारतीय वरिष्ठ महिला संघाचे वार्षिक करार जाहीर केले होते. IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्यात गुवाहाटी येथे बैठक होणार होती.

परंतु ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय. या बैठकीत पुरुष संघाचा वार्षिक करार आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारत ‘अ’ आणि वरिष्ठ संघाची निवड या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती. दरम्यान आयपीएल संपल्यानंतर भारत २० जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

श्रेयस अय्यरचा कॉन्ट्रक्टच्या यादीत समावेश

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार,अय्यरचा बीसीसीआयच्या सेंन्ट्रल कॉन्ट्रक्ट यादीत पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे. २९ मार्च रोजी बीसीसीआयची उच्चस्तरीय बैठक होणार होती. परंतु ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय. या बैठकीत ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला कॉन्ट्रक्टमध्ये स्थान द्यावे की नाही यावरही चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT